उत्तरकाशी - प्रसिद्ध गंगोत्री धामाचे दरवाजे आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी बंद करण्यात आले आहे. देवी गंगेची पालखी ढोल-ताशाच्या गजरात मुखबा गावाकडे रवाना झाली. पुढील सहा महिने देवी गंगा मखुबा गावात राहणार आहे. मुखबा गावातील सेमवाल पुरोहित आता देवीचीविधीवत पूजा करतात.
कोरोनाकाळात गंगोत्री धामात येणाऱ्या भक्तांची संख्या कमी झाली होती. देवी गंगेची पालखी ढोल-ताशाच्या गजरात मुखबा गावाकडे रवाना झाली असून रस्त्यामध्ये मार्कण्डेय मंदिरात पालखी विश्राम करणार आहे. तिथे स्थानिक लोक देवीचे दर्शन घेतील.