वाराणसी (उत्तरप्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज MV गंगा विलास या जगातील सर्वात लांब नदी क्रूझचे उदघाटन करणार आहेत. यामुळे भारतासाठी नदी क्रूझ पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लक्झरी क्रूझ भारत आणि बांगलादेशातील पाच राज्यांमधील 27 नद्यांमधून प्रवास करून 3,200 किमी पेक्षा जास्त अंतर पार करणार आहे. चला तर जाणून घेऊयात या जहाजांविषयी..
देश-विदेशातील ५० पर्यटन स्थळांना देणार भेट:51 दिवसांच्या क्रूझमध्ये जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट आणि बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यांसारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आहे. MV गंगा विलास जहाज 62 मीटर लांब, 12 मीटर रुंद आहे. यात तीन डेक, 36 पर्यटकांच्या क्षमतेसह 18 सुइट्स आहेत, ज्यात पर्यटकांना एक संस्मरणीय आणि विलासी अनुभव देण्यासाठी सर्व सुविधा आहेत.
गंगा विलास जहाजाचा मार्ग:क्रूझचा प्रवास वाराणसी येथून सुरू होईल आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूरमार्गे बिहार मध्ये पाटणा आणि नंतर कोलकाता येथे पोहोचेल. त्यानंतर बांगलादेशच्या नदीत प्रवेश केल्यानंतर, दिब्रुगढपर्यंत १५ दिवसांनी ती आसामच्या गुवाहाटी शहरात प्रवेश करेल. ६२ मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी असलेल्या या लक्झरी क्रूझ जहाजात तीन डेक, १८ सूट असून त्यात ३६ लोक बसू शकतात. तसेच हे जहाज नदी किंवा पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे प्रदूषित करत नाही.
गंगा विलास क्रूझचे बुकिंग:समुद्रकिनारे, हिरवेगार खारफुटी जंगल, स्थलांतरित पक्षी आणि कासवे, गोड्या पाण्यातील डॉल्फिन्स, पाण्याचे प्रवाह, पक्ष्यांच्या किलबिलाटाने व्यत्यय आणलेला शांत परिसर आणि सदैव आलिंगन देणारा निसर्ग गंगा विलास क्रूजच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जगातील कोठूनही कोणीही याचे तिकीट बुक करू शकतो. प्रति रात्र प्रति व्यक्ती सरासरी भाडे सुमारे 25000 रुपये आहे.