महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; विरोध करताच कारमधून फेकून दिले - gang raped in Kaushambi

उत्तरप्रदेशातील कौशांबीमध्ये चालत्या कारमध्ये दोन जणांनी महिलेवर बलात्कर केल्याची घटना घडली. शुद्धीवर आल्यानंतर महिलेने प्रतिकार करण्यास सुरुवात केली दिला तर आरोपींनी तिला चालत्या गाडीतून बाहेर फेकले आणि पसार झाले. या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशात चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार
उत्तर प्रदेशात चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार

By

Published : Mar 23, 2021, 5:39 PM IST

उत्तर प्रदेश- राज्यातील कौशांबी जिल्ह्यात दोन जणांनी चालत्या गाडीत महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी पीडितेला प्लॉट दाखवण्याच्या कारणाने प्रयागराजवरून पिपरी येथे घेऊन आले होते. रसत्यात आरपींनी महिलेले गुंगी येणारे पेय पाजून बेशुद्ध केले. मात्र, शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने प्रतिकार करण्यास सुरुवात केल्यामुळे आरोपींनी चालत्या गाडीतून पीडितेला खाली फेकले आणि पसार झाले. पीडितेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिषेक शुक्ला आणि भूपेंद्र कुमार अशी अरोपींची नावे असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा-यूपीतला चोर, फक्त उन्हाळ्यात करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

खोकला आला म्हणून महिलेला पाजले होते गुंगीचे औषध

पीडिता प्रयागराजमधील फाफामऊ पोलीस स्टेशन परिसरात राहते. सोमवारी अभिषेक शुक्ला आणि भूपेंद्र कुमार पीडितेला प्लॉट दाखवण्याच्या कारणाने मखऊपूर गावाजवळ घेऊन गेले होते. रसत्यात खोकला आला म्हणून आरोपींनी पीडितेला दुकानातून औषध खरेदी करून पाजवले. औषध घेतल्यानंतर पीडितेची शुद्ध हरपली. त्यानंतर दोघांनी चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला.

विरोध करताच चालत्या कारमधून फेकले

शुद्धीवर येताच पीडितेने प्रतिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपींनी चालत्या कारमधून पीडितेला खाली फेकले आणि ते फरार झाले. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा-धक्कादायक! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, आरोपी गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details