महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 13, 2022, 11:01 AM IST

Updated : May 13, 2022, 11:28 AM IST

ETV Bharat / bharat

रांचीमध्ये विद्यार्थिनीचे अपहरण करून कारमध्ये सामूहिक बलात्कार

रांचीमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. तरुणीवर सामूहिक बलात्कार करताना 5 गुन्हेगार रंगेहात पकडले आहेत. सर्व गुन्हेगारांना अटक केल्यानंतर पोलीस पुढील कारवाईत व्यस्त आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो

रांची -येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही मुलगी 21 वर्षाची आहे. ही घटना रांचीच्या रातू पोलीस स्टेशन परिसरातील घडले. यामध्ये 5 जणांनी तरुणीला भिती दाखवत तीचे अपहरण केले. ( Gang-Gaped a Girl In Ranchi ) तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करून पाच आरोपींना अटक केली आहे. ही मुलगी गुरुवारी (दि.12 मे)रोजी रात्री घरी परतत होती. यादरम्यान कारमधील काही तरुणांनी तीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. यानंतर सर्वांनी एका रेस्टॉरंटबाहेर कार थांबवून तिच्यावर बलात्कार केला.


दरम्यान, रात्रीच्या गस्तीवर तैनात असलेल्या डीएसपी अंकिता यांना रांचीच्या रातू पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका रेस्टॉरंटच्या बाहेर कार पाहून संशय आला. नियमित गस्तीवर असताना कारची तपासणी केली असता आत बसलेली तरुणी रडत असताना पाच युवक आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले.


प्रकरण लक्षात घेऊन डीएसपी अंकिता राय यांनी धुर्वा स्टेशन प्रभारी प्रवीण झा यांना फोन केला आणि तात्काळ फोर्स पाठवण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सर्व आरोपींना अटक करून रतू पोलीस ठाण्यात नेले. डीएसपी अंकिता राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळ धुर्वा पोलीस ठाण्याजवळ होते, त्यामुळे धुर्वा पोलीस ठाण्यातून फौजफाटा मागवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.


पोलिसांच्या चौकशीत अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला असून, अटक करण्यात आलेले काही आरोपी हे राज्याबाहेर शिक्षणासाठी आहेत. अटक करण्यात आलेले दोन तरुण हे उत्तम शैक्षणिक आस्थापनांमध्ये शिक्षण घेत आहेत. तरुणी रस्त्यावरून एकटीच जात असल्याचे पाहून आम्ही हे कृत्य केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. या मुलीला रस्ता विचारला, अन् तीला गाडीत ओढले. दरम्यान, काळ्या काचा असलेल्या कारमधून कही दिसणार नाही असे आरोपींना वाटत होते. मात्र, त्यांचे कृत्य दिसले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा -Sharad Pawar : पाकिस्तानचा सामान्य माणूस आपला विरोधक नाही : शरद पवार

Last Updated : May 13, 2022, 11:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details