हैदराबाद - शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांनी मर्सिडीज कारमध्ये हे कृत्य केले आहे. पीडित मुलगी एका पार्टीसाठी पबमध्ये गेली होती. यावेळी तिची भेट या आरोपी मुलांसोबत झाली होती. आरोपी हे विद्यार्थी असून अकरावी, बारावीत शिकत आहेत. यातील पाच जणांची ओळख पटली आहे. यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. तर एकाला ३ तारखेला तर दुसऱ्याला ४ तारखेला सकाळी अटक केली आहे.
सदुद्दीन मलिक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ४ तारखेला सकाळी आणखी एकाला अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी १७ वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पबमध्ये गेली होती. यावेळी तिचा मित्र तिथून लवकर निघाला होता. यानंतर तिची आरोपींमधील एका मुलासोबत ओळख झाली. घरी सोडतो असं सांगितल्याने तरुणी त्याच्यासोबत तेथून निघाली होती. यावेळी त्याचे मित्रही सोबत होते.