यंदाचा गणेशोत्सव Ganeshotsav 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीचा सण गणेश जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान लोक मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला घरात आणतात. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये बाप्पाचे नाव सर्वत्र ऐकू येते. गणपतीला बुद्धीची आणि शुभाची देवता मानतात. त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात. असे म्हणतात की जिथे बाप्पाचा वास असतो तिथे सदैव सुख समृद्धी असते. तर यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन अत्यंत शुभ योगाने होत आहे. अशा परिस्थितीत या वर्षी बुधवारी गणेश प्रतिष्ठापना Ganesh Sthapana होणार आहे.
हे आहेत दोन शुभ योग पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ३० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३:३४ वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3:23 वाजता संपेल. उदय तिथीनुसार 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात मानली जाणार आहे. या दिवशी दोन शुभ योग तयार होत आहेत. बुधवार हा गणपतीला समर्पित असून यंदाचा गणेशोत्सवही बुधवारपासून सुरू होत आहे. याशिवाय गणेश चतुर्थीलाही रवियोगाचा योग जुळून येत आहे. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीचे महत्त्व अधिकच वाढते. रवि योग 31 ऑगस्ट रोजी सकाळी 06:06 ते 01 सप्टेंबर रोजी सकाळी 12:12 पर्यंत आहे. रवियोगात गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो, असे मानले जाते.
गणेश पूजनाचे संपूर्ण साहित्यवाती समईसाठी आणि तुपात भिजवलेल्या, फुलवाती तुपात भिजवलेल्या, कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र, जानवं, गणपतीसाठी सजावटीचे सामान, फुले, फुलांचे हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री, पेढे किंवा मिठाई, फळे, नारळ, पंचामृताचे साहित्य दही आणि दुध