महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ganesh Visarjan 2023 : मूकबधिर मुलांनी केली सांकेतिक भाषेत गणपतीची आरती, पहा व्हिडिओ - Aarti of Ganesha in sign language

Ganesh Visarjan 2023 : इंदोरच्या मूकबधिर संस्थेच्या बधिर द्विभाषिक अकादमीमध्ये गणेशाची सांकेतीक भाषेत आरती तयार करण्यात आली आहे.

Ganesh Visarjan 2023
Ganesh Visarjan 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 5:19 PM IST

सांकेतिक भाषेत गणपतीची आरती तयार

इंदूरGanesh Visarjan २०२३ : शहरातील मूकबधिर द्विभाषिक अकादमीतील मुलांना बोलता, ऐकता येत नसल्यानं त्यांनी गणेशजींची आरती सांकेतिक भाषेत तयार केली आहे. गणेशोत्सवादरम्यान सकाळ-संध्याकाळ स्वतःच्याच भाषेत ते गणेशाची आरती म्हणतायत.

सांकेतीक गणेश आरती :इंदोरच्या मूकबधिर संस्थेच्या बधिर द्विभाषिक अकादमीमध्ये होणाऱ्या या आरतीतील आरतीचे शब्द, प्रार्थना तुम्हाला कदाचित ऐकू येणार नाहीत, परंतु आरती करणारी ही शेकडो मुले आपल्या भावना भगवान गणेशासमोर व्यक्त करतायत. ही आरती केजीपासून ते कॉलेजपर्यंत मुकबधिर मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. देशातील जवळपास प्रत्येक राज्यातून, शहरातून इथं शिक्षणासाठी मुलं येतात. त्यामुळं या मुलांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या भाषेतील सांकेतीक गणेश आरती तयार केलीय.

आरतीमध्ये संस्थेचे 300 लोक सहभागी :या वर्षी त्यांनी आपल्या संस्थेत केवळ गणेशाची स्थापनाच न करता आरतीची तयारीही स्वतः केली. संस्थेशी संबंधित पंडितजींनीही त्यांना या निर्णयात मदत केली. या मुलांनी गणेशाजवळ चंद्रयान 3 चे प्रदर्शनाचा देखावा देखील तयार केलाय. यानंतर त्यांना सांकेतिक भाषेत आरतीचा अर्थ समजावून सांगून संपूर्ण आरती तयार करण्यात आली.विविध संघप्रमुखांना आरतीसाठी दोन तास प्रशिक्षण दिल्यावर संस्थेत गणेश मूर्तीसाठी वंदना घेण्यात आली. या आरतीमध्ये संस्थेचे 300 लोक सहभागी झाले होते. गणेश उत्सवाचा योग्य पेहराव, पूजेची सर्व साधनसामग्री घेऊन मुलं दररोज रात्री सांकेतिक भाषेत आरती करू लागली. इतरांप्रमाणेच ते सांकेतिक भाषेत अनोखी आरती सादर करत आहेत. सकाळ-संध्याकाळ आरती करणाऱ्या या मुलांपैकी काही जण केवळ अभ्यासात यशस्वी होण्यासाठीच नव्हे, तर स्वावलंबी होण्यासाठी गणेशाला प्रार्थना करत आहेत, तर काहींनी उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

श्रीगणेशाचं विसर्जन :गणेशोत्सवापूर्वी मुलांना देव, उपासना समजली असली तरी पूजा, उपवास, आरतीची पद्धत त्यांना अवगत नव्हती, मात्र, आता ते भक्तीत मग्न होऊन सांकेतिक भाषेत आरती गात आहेत. त्याचं मनही भक्तीमध्ये रमून जातंय. सांकेतिक भाषेत आरती करताना दिसणारे मुलांना बघूनही लोक भारावून जात आहेत. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही सर्व मुले आपापल्या खास शैलीत आरती करून गणपतीला निरोप देणार आहेत. त्यानंतर ते उज्जैनलाही पोहोचतील. शारीरिक अपंगत्व कुणालाही येऊ नये, अशी प्रार्थना करून श्रीगणेशाचं विसर्जन करतील.

ABOUT THE AUTHOR

...view details