हैदराबाद Ganesh Laddu Auction In Hyderabad : हैदराबादच्या बंदलागुडामध्ये लाडूंच्या लिलावानं विक्रम केला. परिसरातील प्रसिद्ध रिचमंड व्हिला येथे झालेल्या लिलावात एका गणेश लाडूची १.२० कोटी रुपयांची बोली लागली. बंदलागुडा येथील गणेश लाडूंच्या लिलावानं नविन विक्रम केलाय. कीर्ती रिचमंड व्हिलाच्या गणेश लाडूला एका व्यक्तीनं 1.20 कोटी रुपयांना विकत घेतलं. गेल्या वर्षी याच ठिकाणी झालेल्या लिलावात या लाडूची किंमत 60.80 लाख रुपये होती. त्यानं मागील विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम केलाय.
लाडूंचा लिलावातून गरजूना मदत : या लिलावात मिळणारा सर्व पैसा समाजसेवेत खर्च होणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं. ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून विनायक महोत्सवाचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जात आहे. गणेश महोत्सव समितीचे व्यवस्थापक म्हणाले की, आम्ही सर्वजण जवळपास 10 वर्षांपासून येथे पूजा करत आहोत. दरवर्षी आम्ही गणेश लाडूंचा लिलाव करतो. जे काही पैसे मिळतात ते आपण दान करतो. आम्ही या पैशाचा उपयोग सरकारी शाळा आणि गरजू आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच अभ्यास करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वापरतो. आजही लिलावानंतर मिळणारी रक्कम सेवा कामासाठी वापरणार आहोत. गेल्या वर्षी लिलावातून आम्हाला 60 लाख रुपये मिळाले होते. या वर्षी आम्हाला 1.20 कोटी रुपये मिळाले आहेत.