अहमदाबाद -आपण भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे केले. यानिमित्ताने पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. तसेच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दाखवलेला प्रगतीशील मार्ग. ते म्हणाले होते, आपण वर्तमानात काय करतो यावर आपले भविष्य अवलंबून आहे. महात्मा गांधींनी अशा भारताचा विचार केला जो स्वावलंबी असेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लागेल. त्यांचा असा विश्वास होता की चरखा हा स्वावलंबी होण्याचा एक मार्ग आहे आणि तोच स्वातंत्र्य लढ्याचा केंद्रबिंदू होता. रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही या चरख्याचे चक्रच स्वतंत्र भारतासाठी आश्चर्यकारक काम केले, अशी त्यांना खात्री होती.
चरख्याचे महत्व कमी -गेल्या 75 वर्षात देशाने प्रगतीची उच्च शिखरे गाठली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील यांत्रिकीकरणामुळे चरख्याचे महत्व कमी झाले तरी पण वारसा मात्र कायम आहे. जर इतिहासाचा विचार केला तर, 25 मे 1915 रोजी भारतात परतल्यावर गांधीजींनी लोकांना चरख्याची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला होता. 1920 च्या मध्यापर्यंत चरख्याने लोकांच्या मनात प्रवेश केला होता. चरखा हा स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख प्रतीक म्हणून उदयास आला. सुरुवातीला चरख्यांवरच खादीचे कापड तयार झाले. आजही खादी उद्योगात जगात आपण आघाडीवर आहोत.
दिवसात जास्तीत जास्त 12 मीटर खादी -एकट्या गुजरातमध्ये, सुमारे 12.15 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. तिथे वार्षिक उत्पादन सुमारे 31.50 लाख बॉल्स ऑफ कॉटन अर्थात लिंट होते. त्याचे सुती कापड तयार होते. पूर्वी हे कापड चरख्यावर हाताने विणले जात होते. काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाने लोकांच्या दैनंदिन जीवनात जोरदार प्रवेश केल्याने, चरख्याचे महत्त्व झपाट्याने कमी झाले आहे. अहमदाबादमधील इमाम मंझील येथे ५० वर्षांपासून खादी विणकर रणजीत यांनी ते गांधींच्या विचारांच्या मार्गाने कसे चालले होते यावर आपला अनुभव सांगितला. ते ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, मी 10 वर्षांपासून इमाम मंझिलमध्ये खादी विणत आहे. पूर्वी मी इतर ठिकाणी काम करायचो. खादी तयार करण्याचे काम हेच माझे उदरनिर्वाहाचे साधन आहे. खादीच्या कापडाच्या तुलनेत मशीनमध्ये खादी वेगाने बनवली जाते. हाताने विणकाम करून एका दिवसात जास्तीत जास्त 12 मीटर खादी तयार होते.
चरखा पूर्णपणे इतिहासजमा होणार -रणजीत यांनी सूत कातण्याची आणि विणकामाची कला वडिलांकडून शिकून घेतली. मात्र ते त्यांच्या सध्याच्या समस्यांबद्दल बोलणे टाळतात. रणजीत यांना दोन मुले आहेत. त्यांनी आता विणकाम सोडून खाजगी कंपनीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. विणकाम आणि मास स्पिनर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांचीही हीच अवस्था आहे. चरख्याला याचा फटका बसत आहे. जुनागढच्या मंगरूळ तालुक्यातील दिवासा गाव, जे पूर्वी पूर्णवेळ हाताने चरख्याद्वारे विणकाम आणि मास स्पिनिंगमध्ये कार्यरत होते. आता त्यांनीही ते काम सोडले आहे. गावात आता हातमाग आणि यांत्रिक मागांवर विणकाम केले जाते. ज्यामुळे गांधीजींचा चरखा पूर्णपणे इतिहासजमा होणार असे दिसते.
व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न -दिवासा गावातील विणकर अनेक वर्षांपासून हातमागावर कापड बनवत आहेत. पण एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात इथले विणकर सूतकताई आणि हातमाग व्यवसाय वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. एकेकाळी गावातील सर्व लोक हातमाग आणि चरख्याद्वारे कापड बनवून काम करत होते. येथे पंजाब, दिल्ली, हरियाणा, अहमदाबाद आणि जामनगर येथून कच्चा माल यायचा. सध्या शाल ही या परिसराची प्रमुख ओळख आहे. दिवासा गावातील विणकर सांगतात की ते पारंपारिक व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. सध्याच्या फॅशन ट्रेंडसह, मिलच्या कपड्यांशी त्यांची तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे हातमागाचे कापड झपाट्याने मागे पडत आहे. सध्याच्या परिस्थितीत हे कापड व्यावसायिकदृष्ट्या अव्यवहार्य बनले आहे.
हातमाग कापड बनवण्यास सुरुवात -सुरेंद्रनगरकडे पाहिल्यात तिथेही यापेक्षा काही वेगळे चित्र दिसत नाही. सुरेंद्र नगर जिल्ह्यात सर्वाधिक कापूस उत्पादन होऊनही खादी उद्योगात मोठी घसरण होत आहे. घटत्या व्यवसायामुळे हात विणकर आता हातमाग विणकामाकडे वळले आहेत. सुरेंद्र नगरच्या मुळी तालुक्यातील गौतमगड येथील मूळ रहिवासी असलेले हिंमत डोलिया आजवर पिढ्यानपिढ्या हातमागावर कापड विणत होते. पण आता त्यांनी हा व्यवसाय सोडला आहे. या कुटुंबाने अलीकडे वडिलोपार्जित व्यवसाय सोडून हातमाग व्यवसाय सुरू केला आहे. हातमाग विणकर हिंमत डोलिया यांनी सांगितले की त्यांचे पूर्वज चरख्यावर काताईच्या माध्यमातून खादी विणत असत. परंतु खादीच्या किमतीत वाढ न झाल्याने आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी त्याऐवजी हातमाग कापड बनवण्यास सुरुवात केली.
चूल पेटणेही मुश्किलीचे -पण तरीही त्याचा लाभ झाला नाही. यामुळे त्याला घर चालवणे आणि त्याच्या घरची चूल पेटणेही मुश्किलीचे झाले आहे. त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. पॅकेजेस तसेच ग्राहकांना त्यांच्याकडून थेट वस्तू खरेदी करण्याची योजना देण्याचा प्रस्तावही दिला आहे. पण त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. हेच नाही तर इतर अशा अनेक असंख्य कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसायाला रामराम केला आहे. गुजरातमध्ये, वैयक्तिक विणकाम सध्या अहमदाबादमध्ये आढळते. तिथे चरखा कताई आता दुर्मीळ होत चालली आहे. पण सुरेंद्र नगर, लिबडी, धंधुका, लाठी आणि मेहसाणा आणि नवसारी येथे आजही हाताने विणकाम चालते. मात्र सामुहिकपणे फक्त अहमदाबादमध्येच विणकाम केले जाते, इतर कोठेही नाही.
रामजी बधिया -राज्यातील एकूण 10,000 विणकरांपैकी एक रामजी बधिया होते. ते त्यांची सुरस कथा सांगत की त्यांचे संपूर्ण कुटुंब कसे हाताने विणकाम करत होते. आता ही कथा सांगण्यासाठी रामजी हयात नाहीत, तर त्यांचा नातू हेमंत आता ही गोष्ट सांगतो. विशेष म्हणजे रामजी बधिया यांनीच गांधीजींना चरख्यावर सूत कसे कातायचे ते शिकवले होते. बापूंनी 1917 मध्ये कोचरबहून अहमदाबादमधील साबरमतीच्या काठावर त्यांचा आश्रम स्थलांतरित केला होता. तेव्हाच त्यांनी हातमाग विकत घेतला. पण राष्ट्रपिता यांना तो हाताळणे कठीण झाले. मग ते काम रामजींवर येऊन पडले. गांधीजींच्या विनंतीवरुन, रामजी आणि त्यांची पत्नी आणि मुले त्यांचे मूळ गाव लाठी सोडून आश्रमात स्थायिक झाले आणि तेथे विणकाम सुरू केले. त्यावेळी गांधीजी हे रामजी बधिया यांचे पहिले विणकाम करणारे विद्यार्थी होते. सर्व आश्रमवासी देखील ही कला शिकू लागले, असे रामजींचा नातू हेमंत याने ईटीव्ही भारतला सांगितले.