महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Diwali 2022 Gambling Tradition : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खेळला जातो जुगार, जाणून घ्या काय आहे शुभ आणि काय अशुभ - Lakshmipujan

लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो. लक्ष्मीपूजनाच्या रात्री अनेक प्रांतात जुगार (Diwali Gambling Tradition) खेळण्याची परंपरा आहे. ही एक प्राचिन परंपरा (Ancient tradition) असून काही भागात ती शुभ तर काही भागात अशुभ मानली जाते. चला तर मग जाणून घेऊ या परंपरेबद्दल....

Diwali 2022 Gambling Tradition
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खेळला जातो जुगार

By

Published : Oct 24, 2022, 4:58 PM IST

कार्तिक अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 24 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात सगळीकडे लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळी सणातील (Diwali Festival) मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते. कारण जिथे प्रकाश आणि स्वच्छतेचा वास होतो तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होती अशी मान्यता आहे.

प्रकाशपर्व म्हणून देशभरात दिवाळी (Diwali 2022) साजरी केली जाते. दिवाळीबाबत देशभरात अनेक परंपरा आहेत. लक्ष्मीपूजनाच्या रात्री अनेक प्रांतात जुगार (Diwali Gambling Tradition) खेळण्याची परंपरा आहे. ही एक प्राचिन परंपरा (Ancient tradition) असून काही भागात ती शुभ तर काही भागात अशुभ मानली जाते.

जुगार खेळण्याची परंपरा: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक प्रांतात जुगार (Diwali Gambling Tradition) खेळला जातो. दिवाळी सणात जुगार खेळण्याची परंपरा कशी आली. या खेळामागे काय प्रचलित कथा आहे, याबाबतची रंजक माहिती आम्ही आपल्यासाठी घेवून आलो आहोत.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी का खेळला जातो जुगार?आजच्या दिवशीच्या अनेक कथा आणि समजुती आहेत. आजच्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर बहुतेक घरांमध्ये जुगार किंवा पत्ते खेळले जातात. दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे शुभ मानले जाते. कारण, भगवान शिव आणि माता पार्वतीने कार्तिक महिन्याच्या रात्री चौसर खेळ खेळले होते. या खेळात महादेवाचा पराभव झाला. तेव्हापासून दिवाळीच्या रात्री जुगार खेळण्याची परंपरा सुरू झाली अशी दंतकथा सांगितली जाते.

जुगार खेळणे शुभ की अशुभ (auspicious and inauspicious): दिवाळीची रात्र ही महानिषाची रात्र मानली जाते आणि ही रात्र शगुनांनी भरलेली असते. या रात्री पूजेच्या वेळी लक्ष्मीचे आवाहन केले जाते. दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे हे विजय-पराजयाचे लक्षण मानले जाते. असे मानले जाते की, या रात्री जी व्यक्ती जुगारात विजयी होते त्याचे नशीब वर्षभर उजळून निघते. तर काही लोक दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे अशुभ मानतात. कारण असे केल्याने घरातील सुख-शांती सोबत लक्ष्मी निघून जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details