लुधियाना -पंजाबमध्ये दरवर्षी सुमारे 29.68 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाचे उत्पादन केले जाते. मात्र, गव्हाची काढणी, रास झाल्यानंतर जो शिल्लक टाकाऊ माल राहतो त्यास काड किंवा गव्हाचा कडबा म्हणतात. मात्र, मागील काही दिवसांपासून काड जळण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. यामुळे परिसरातील प्रदुषणात वाढ तर होत आहेच सोबतच यामुळे नागरिाकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. मात्र, संशोधकांनी यासाठी एक उत्तम उपाय शोधून काढला आहे.
सुरुवातील पारंपारिक शेती करणारा शेतकरी आता आधुनिकतेच कास धरत आहे. यासाठी लागणारी यंत्र, सामग्रीही तो खरेदी करत आहे. मात्र, हे यंत्र, सामग्री खूप महाग असल्याने छोट्या शेतकऱ्यांना खरेदी करण्यास अडचणी येत होत्या. पण, पंजाब सरकार मागील काही वर्षांपासून यंत्रसामग्री भाड्याने देण्याची योजना राबवत आहे. यामुळे छोटा शेतकरीही मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्या शेतात करू लागला आहे. यामुळे गव्हाचे काडही मोठ्या प्रमाणात शिल्लक पडत आहे. मात्र, त्या जळण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठी डोकेदुखी झाली आहे.
तीन वर्षांत लाखो घटना -मागीलतीन वर्षांत काड जाळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून तब्बल दोन लाख दोन हजार 826 घटनांची नोंद झाली आहे. मागील 10 वर्षांची आकडेवारी पाहिली तर 2019 मध्ये 55 हजार 210, 2020 मध्ये 70 हजार 592, 2021 मध्ये 71 हजार 24 घटना समोर आल्या आहेत. 2020 मध्ये 17.96 लाख हेक्टर क्षेत्र पंजाबच्या शेतकऱ्यांनी आग लावली. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली. कोरोना काळात याचा प्रभाव मानवी शरिरावर जास्त दिसला. कोरोना काळात खोकला, घशात खवखव यासह अनेक समस्या उत्तर भारतात पहायला मिळाल्या. काड जाळण्याच्या वेळात याची संख्या जास्त होते.
गडवासु (GADVASU) चे संशोधन -गुरु अंगद देव पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाने काडच्या विल्हेवाटासाठी एक संशोधन केले आहे. काडमध्ये यूरिया मोलासिस मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. ते मिश्रण पशु खाऊ शकतात. असे खाद्य खाल्ल्यानंतर प्राणांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले.