नवी दिल्ली : देशातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्र्यांनी काही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत दावा केला की त्यांनी कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट घालणे टाळले.
मुख्यमंत्र्यांनीही सीट बेल्ट लावला नाही - सामान्य लोकांच्या गाड्या विसरा. मी चार मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या गाड्यांमधून प्रवास केला होता. मला नावे विचारू नका. मी समोरच्या सीटवर होतो. मी चालकांना बेल्ट कुठे आहेत ते विचारले आणि कार सुरू होण्यापूर्वी मी सीट बेल्ट लावला आहे याची खात्री केली.
मागील सीट बेल्टच्या गरजेवर गडकरी म्हणालेकी, लोकांना वाटते की, मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना बेल्टची गरज नाही. ही समस्या आहे. मला कोणत्याही अपघातावर कोणतेही भाष्य करायचे नाही. पण दोन्ही फ्रंट-सीटर्स आणि बॅक-सीटरने सीट बेल्ट घालणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवारी आयएएच्या ग्लोबल समिट - नेशन्स अॅज ब्रँड्समध्ये बोलत होते. गडकरी म्हणाले की, सर्व कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या दिशेने मंत्रालय प्रयत्नशील आहे.