महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

G20 Summit : पंतप्रधान मोदींनी जी २० परिषदेत दिला 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र - नरेंद्र मोदी जी २०

नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी २० शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. आज परिषदेच्या पहिल्या दिवशी जगातील २० प्रमुख अर्थव्यवस्थांचे वरिष्ठ नेते एकाच व्यासपीठावर आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र दिला.

Narendra Modi
नरेंद्र मोदी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 12:36 PM IST

नवी दिल्ली :राजधानी नवी दिल्लीत होत असलेल्या दोन दिवसीय जी २० शिखर परिषदेचा आज पहिला दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर शिखर परिषदेत सहभागी झालेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं.

अडीच हजार वर्षांपूर्वी भारतानं 'हा' संदेश दिला : यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मोरोक्कोमधील भूकंपाच्या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत मदतीचं आश्वासन दिलं. त्यानंतर त्यांनी जी २० चे अध्यक्ष म्हणून सर्व देशांचं स्वागत केलं. 'आज आपण जिथं जमलो आहोत, तिथून काही किलोमीटर अंतरावर एक अडीच हजार वर्ष जुना खांब आहे. त्यावर प्राकृतिक भाषेत लिहिलं आहे की मानवतेचं कल्याण नेहमीच केलं पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारतानं संपूर्ण जगाला हा संदेश दिला होता. २१ व्या शतकातील हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा देणारा आहे. जग आपल्याकडून नवीन उपायांची मागणी करत आहे', असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

आफ्रिकन युनियनला जी २० चं स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव : आफ्रिकन युनियनला जी २० मध्ये कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वांसोबत एकजुटीच्या भावनेनं भारतानं आफ्रिकन युनियनला जी २० चं स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मला विश्वास आहे की आपण सर्वजण या प्रस्तावावर सहमत आहोत, असं मोदी यावेळी म्हणाले.

'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र दिला : यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र दिला. कोरोनानंतर विश्‍वासाच्या अभावामुळे जगावर मोठं संकट आलं. युद्धामुळे हे संकट अधिक गडद झालं. जेव्हा आपण कोविडला पराभूत करू शकतो, तेव्हा आपण परस्पर विश्वासाच्या या संकटावरही मात करू शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी जी २० चे अध्यक्ष या नात्यानं संपूर्ण जगाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. त्यासाठी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयत्न' हा मंत्र आपल्यासाठी मार्गदर्शक बनू शकतो, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा :

  1. G20 Summit : जी २० परिषदेचा काय आहे अजेंडा? जाणून घ्या
  2. Rishi Sunak India Visit : भारतात पोहोचताच 'देसी' स्टाईलमध्ये दिसले ऋषी सुनक
  3. G20 Summit : जी २० दरम्यान सायबर हल्ल्याची भिती, जाणून घ्या काय आहे भारताचा फुलप्रूफ प्लॅन

ABOUT THE AUTHOR

...view details