महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

G20 session on One Future : पंतप्रधान मोदींकडून जी २० परिषद संपल्याची घोषणा, पुढील अध्यक्षपद 'या' देशाला मिळणार - Brazil new President of G20

G20 session on One Future : नवी दिल्ली येथील G20 परिषदेच्या वन फ्युचर या शेवटच्या सत्रात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'नवीन जागतिक रचना' मध्ये जगाची 'नवीन वास्तविकता' प्रतिबिंबित झाली पाहिजे. तसेच यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांसह जागतिक संस्थांच्या सुधारणांचा पुरस्कार केलाय.

संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवर पंतप्रधान मोदींनी दिला भ
G20 session on One Future

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 4:44 PM IST

Updated : Sep 11, 2023, 1:00 AM IST

नवी दिल्ली G20 session on One Future :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज G20 परिषदेच्या वन फ्युचर सत्रात बोलताना संयुक्त राष्ट्रसंघासह जागतिक संस्थांमध्ये सुधारणांवर नव्याने जोर दिलाय. जागतिक संस्थेच्या सदस्य राष्ट्रांमध्ये वाढ झाली असली तरी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यांची संख्या तशीच असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलयं. (G20 Council In New Delhi)

क्रिप्टो चलन हा नवीन विषय : नवी दिल्ली येथील G20 परिषदेच्या वन फ्युचर या शेवटच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जगाची 'नवीन वास्तविकता' ही 'नवीन जागतिक रचनेत' बदलली पाहिजे. जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाची 51 सदस्यांसह स्थापना झाली तेव्हा जग वेगळे होते. मात्र, आता सदस्य देशांची संख्या जवळपास 200 झालीयं. त्यामुळे जागतिक संस्थेने आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी मदत देण्यासाठी स्वतःला मर्यादित करू नये. हा निर्सगाचा नियम आहे, असंही मोदींनी म्हटलयं. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जे काळाबरोबर बदलत नाहीत ते त्यांची प्रासंगिकता गमावतात. क्रिप्टो चलन हा सामाजिक सुव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्यासाठी नवीन विषय होता. त्याचे नियमन करण्यासाठी मोदींनी जागतिक मांनाकनाची मागणीही केली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी आवाहन : जागतिक संस्था अधिक समावेशक आणि प्रातिनिधिक बनवण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी वारंवार आवाहन केलयं. ब्राझील, जर्मनी आणि जपानचा समावेश असलेल्या G4 राष्ट्रांचा भारत एक भाग आहे. ही राष्ट्रे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागांसाठी एकमेकांना पाठिंबा देतात. संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणा अजेंडाच्या उद्दिष्टांना, संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी अखेरीस मान्यता दिलीयं. यामध्ये चळवळीचे अधिक स्वातंत्र्य, विकेंद्रीकरण, परिणामकारकता, वाढीव पारदर्शकता तसेच जबाबदारी यांचा समावेश आहे.

ब्राझिल G20 परिषदेचे अध्यक्षपद :दरम्यान नवी दिल्ली येथील G20 परिषदेच्या वन फ्युचर या शेवटच्या सत्रात G20 परिषदेच्या नव्या अध्यक्षांची करण्यात आलीयं. ब्राझीलचे राष्ट्रपती आणि माझे मित्र लुला दा सिल्वा यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत G20 च्या अध्यक्षपदाचं गेवल (प्रातिनिधिक चिन्ह) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलयं. म्हणजेच, नोव्हेंबर २०२३ नंतर G20 चं अध्यक्षपद ब्राझिलकडे असणार आहे. (Brazil new President of G20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांना पारंपारिक गिव्हल (हातोड्याचा एक प्रकार) सुपूर्द केला. यासोबतच पंतप्रधान मोदींनी G20 नेत्यांची शिखर परिषद संपल्याची घोषणा केली. यावेळी लुला डी सिल्वा यांनी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल भारताचे कौतुक केले. मोदींनी अध्यक्षपदासाठी ब्राझीलला गिव्हल सुपूर्द करत शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. G२० Summit : जी20 परिषदेतील दिग्गजांनी राजघाटवर महात्मा गांधींना वाहिली आदरांजली; महाराष्ट्रातील बापू कुटीची प्रतिमा दिली भेट
  2. G२० Delhi Pollution : काय सांगता! जी २० मुळे दिल्लीतील हवा झाली स्वच्छ, कसं काय जाणून घ्या
  3. G२० Summit : जी 20 परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचा अजेंडा, जाणून घ्या सविस्तर
Last Updated : Sep 11, 2023, 1:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details