नवी दिल्ली - देशामधील कोरोनाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. कोरोनाची नवीन रुग्णे विक्रमी पातळीवर नोंदविली जात आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज 2 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. हे देशातील अनियंत्रित कोरोनाचे जिवंत चित्र आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या विदारक परिस्थितीवरून आणि मृत्यूवरून पंतप्रधान मोदींवर हल्ला केला आहे.
‘शमशान और कब्रिस्तान दोनों… जो कहा सो किया’, असे टिवट राहुल गांधींनी केले. तसेच त्यांनी #modimadedisaster हा हॅशटॅगही वापरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कोरोनाचा वाढता संसर्ग, लसीचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत.