महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना नियंत्रणासाठी तामिळनाडूत दोन आठवड्यांचा लॉकडाऊन - तामिळनाडू लॉकडाऊन

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेताच कोरोना नियंत्रणासाठी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तामिळनाडूत शुक्रवारी एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक 26465 नवे रुग्ण आढळले होते.

कोरोना नियंत्रणासाठी तामिळनाडूत दोन आठवड्यांचा लॉकडाऊन
कोरोना नियंत्रणासाठी तामिळनाडूत दोन आठवड्यांचा लॉकडाऊन

By

Published : May 8, 2021, 9:42 AM IST

चेन्नई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता तामिळनाडूत 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 10 मे ते 24 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक वस्तु व सेवा वगळता इतर सर्व बाबींवर निर्बंध असणार आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेताच कोरोना नियंत्रणासाठी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

तामिळनाडूत शुक्रवारी एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक 26465 नवे रुग्ण आढळले होते. यानंतर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 13,23,965 वर गेली. शुक्रवारी कोरोनामुळे तामिळनाडूतील 197 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तामिळनाडूत कोरोनाचे 1,35,355 सक्रीय रुग्ण आहेत. तर चेन्नईत कोरोनाचे 6738 नवे रुग्ण आढळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details