नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ऑक्टोबरमध्ये बँकांना 21 दिवस सुट्टी आहेत. मात्र, या सुट्टी सलग किंवा एकाच राज्यात बँकांना 21 दिवस सुट्टी नाही. जाणून घ्या, महाराष्टारातील बँकांना ऑक्टोबरमध्ये किती दिवस सुट्टी असणार आहेत.
आरबीआयच्या वेळापत्रकानुसार जाहीर होणाऱ्या सुट्टी विविध राज्यांना वेगवेगळ्या असतात. तर काही सुट्टी देशातील सर्व बँकांना लागू होतात. या वेळापत्रकानुसार ऑक्टोरबर 2021 मध्ये बँकांना शनिवारी व रविवारी वगळता केवळ दोन सुट्टी आहेत. तर शनिवार व रविवारीच्या एकूण सहा सुट्टी असणार आहेत.
संबंधित बातमी वाचा-येत्या ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बॅंका राहणार तब्बल २१ दिवस बंद
महाराष्ट्रातील बँकांना या दिवशी सुट्टी
- 2 ऑक्टोबर 2021 - महात्मा गांधी जयंती (संपूर्ण देशभरात)
- 15 ऑक्टोबर 2021- दुर्गा पूजा, दसरा, विजया दशमीनिमित्त संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असणार आहे. केवळ मणीपूर, हिमाचल प्रदेशमधील बँकांचा अपवाद असणार आहे.
हेही वाचा-बाडाहोती सेक्टरमध्ये 100 चिनी सैनिकांनी केली होती घुसखोरी? उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात...
आठवडाखेर या असणार सुट्टी
3 ऑक्टोबर 2021 - रविवारी