महाराष्ट्र

maharashtra

'पंजाब नॅशनल बँक' घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी बेपत्ता

By

Published : May 25, 2021, 9:44 AM IST

या देशातील स्थानिक मीडिया 'अँटिग्वा न्यूज रुम'ने पोलीस आयुक्त अ‌ॅटली रॉडने यांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले. या वृत्तामध्ये असे सांगितले आहे, की भारतीय पोलीस रविवारपासून त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे तो सध्या बेपत्ता असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

Fugitive diamantaire Mehul Choksi missing in Antigua, says Lawyer
'पंजाब नॅशनल बँक' घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी बेपत्ता

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. अँटिग्वा अँड बारबुडा देशातून तो बेपत्ता झाला असून, पोलीस रविवारपासून त्याचा शोध घेत असल्याचे समोर आले आहे.

या देशातील स्थानिक मीडिया 'अँटिग्वा न्यूज रुम'ने पोलीस आयुक्त अ‌ॅटली रॉडने यांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले. या वृत्तामध्ये असे सांगितले आहे, की भारतीय पोलीस रविवारपासून त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे तो सध्या बेपत्ता असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

आधीच घेतले कॅरेबियन बेटांवरील देशाचे नागरिकत्व..

२०१८मध्ये भारतातून फरार होण्यापूर्वीच २०१७मध्ये चोक्सीने कॅरेबियन बेटांवरील अँटिग्वा अँड बारबुडा देशाचे नागरिकत्व घेतले होते. रविवारी तो देशाच्या दक्षिण भागात गाडी चालवताना दिसून आला होता. त्यानंतर त्याची गाडी आढळून आली, मात्र तो कुठे आहे याची माहिती मिळाली नाही. चोक्सीच्या वकिलांना याबाबत विचारणा केली असता त्यांनीही काही माहिती देण्यास नकार दिला.

१३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा..

मेहूल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करुन १३,५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील एका तुरुंगात बंद आहे. या दोघांविरोधात सीबीआय तपास करत आहे.

ईडीकडून संपत्ती जप्त..

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये मेहुल चोक्सी याची मुंबईतील 14 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील 1 हजार 460 स्क्वेअर फुटांचा एक फ्लॅट, सोन्या-प्लॅटिनमचे दागिने, हिरे, चांदी, काही मौल्यवान मूर्ती, महागडे घड्याळ, मर्सिडीज बेंझ गाडी या बाबींचा जप्त केलेल्या गोष्टींमध्ये समावेश आहे.

हेही वाचा :'मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहील'- कमल हासन

ABOUT THE AUTHOR

...view details