महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Frog in Upma Crow feather in meal: आंध्र प्रदेशातील दोन विद्यापीठांच्या वसतिगृहांमध्ये उपमामध्ये बेडूक, जेवणात कावळ्याचे पीस - उपमामध्ये बेडूक

पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणम जिल्ह्यात आंध्र प्रदेशातील दोन विद्यापीठांच्या वसतिगृहांमध्ये अन्नात बेडूक आणि कावळ्याची पिसे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही विद्यापीठातील वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी त्यामुळे आंदोलन केले.

जेवणात कावळ्याचे पीस
जेवणात कावळ्याचे पीस

By

Published : Aug 1, 2022, 2:56 PM IST

विजयवाडा - विद्यार्थी वसतीगृहाच्या उपाहारगृहात अन्नामध्ये विचित्र वस्तू आढळल्याने खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या उप्पिटात बेडूक आढळला आहे तर जेवणात कावळ्याचे पीस आढळले. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले.

उपमामध्ये बेडूक: पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजानगरमजवळील नन्नया विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात रविवारी उपमामध्ये मृत बेडूक आढळला. त्यामुळे विद्यार्थांना मळमळू लागले. त्यांच्यात अस्वस्थता पसरली. सकाळी उपमा तयार करून तो मुलांच्या वसतिगृहात आणि मुलींच्या वसतिगृहात पाठवण्यात आला. त्यातील एकामध्ये बेडूक आढळला.

मुलींच्या वसतिगृहातील सुमारे ७५ टक्के उपमा खाल्ल्यानंतर भांड्यात मृत बेडूक आढळून आला. माहिती मिळताच कुलसचिव टी.अशोक यांनी वसतिगृहात पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. कर्मचार्‍यांवर त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. अलीकडे, वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी स्वयंपाक अस्वच्छ आणि निकृष्ट निळत होता. त्यामुळे त्यांनी स्वयंपाकी बदलावा अशी मागणी केली होती. त्यातच हा प्रकार घडल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

जेवणात कावळ्याचा पंख: आंध्र विद्यापीठाच्या नागार्जुन वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कावळ्याचे पंख आढळले. ही घटना शनिवारी रात्री घडल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. रविवारी सकाळी मेसला कुलूप लावून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. इतकं निकृष्ट जेवण कुठेही मिळत नाही म्हणून ते वैतागले होते. वसतिगृहातील जेवण चांगले नसल्याने काही विद्यार्थी बाहेर जाऊन खातात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. जेवणाच्या वेळेशिवाय पिण्याचे पाणी मिळत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यांनी अधिकाऱ्यांना अनेकदा विनंती करूनही त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तसेच विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. मुख्य वॉर्डन विजया मोहन व वॉर्डन हरनाथ यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले व त्यानंतर मेसची चावी दिली.

नागार्जुन वसतिगृहातील जेवण चांगले नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून आल्याचे वॉर्डन हरनाथ यांनी सांगितले. लवकरच स्वयंपाकी बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसतिगृहात 250 विद्यार्थ्यांशिवाय इतरही आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. सातवाहन वसतिगृहाची दुरुस्ती जवळपास पूर्ण झाली असून त्यांना रंगरंगोटी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कामे पूर्ण झाल्यानंतर नागार्जुन वसतिगृहातील विद्यार्थ्यांना हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details