इंफाळ : ईशान्येकडील राज्यात काही आठवड्यांपूर्वी सुरू असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान सुरक्षा दलांनी मणिपूरच्या विविध भागात 'प्रत्युत्तर कारवाईत सुमारे 40 'दहशतवाद्यांना' ठार केले आहे, असे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी रविवारी सांगितले. नागरिकांच्या विरोधात अत्याधुनिक शस्त्रे वापरणाऱ्या या दहशतवादी गटांविरुद्धच्या संरक्षणात्मक कारवाईत, यापैकी सुमारे 40 दहशतवादी वेगवेगळ्या भागात मारले गेले आहेत. काहींना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे.रविवारी मणिपूरमध्ये अर्धा डझनहून अधिक ठिकाणी सशस्त्र गट, सुरक्षा दलांमध्ये ताज्या चकमकी झाल्या आहेत.
लष्कराची कारवाई सुरूच :मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर पोलिस आणि लष्कराची कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या कारवायांमध्ये 30 दहशतवादी मारले गेले आहेत. ज्याची माहिती खुद्द मणिपूर सरकारनेच शेअर केली आहे. मात्र, मणिपूरमधील परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. हिंसाचाराच्या बातम्या रोज पहायला मिळत आहेत.
30 दहशतवाद्यांचा खात्मा :मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दावा केला की, राज्यातील विविध भागात 30 दहशतवादी मारले गेले आहेत. यासोबतच काही दहशतवाद्यांनाही सुरक्षा दलांनी अटक केल्याचे त्यांनी सांगितले. सीएन बिरेन सिंग यांनी माहिती दिली की, ही कारवाई दहशतवादी गटांविरुद्ध कारवाईचा सरु आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी दावा केला की, दहशतवादी एके-47 आणि स्नायपर गनने नागरिकांवर हल्ले करत आहेत. इतकेच नाही तर अनेक गावात घरे पेटवायलाही आले होते. ज्यांच्या विरोधात लष्कर आणि सुरक्षा दलाच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. मणिपूर सरकारने माहिती दिली की, या दहशतवादी गटांविरुद्ध अत्याधुनिक शस्त्रे वापरून नागरी लोकसंख्येविरुद्ध केलेल्या काउंटर, डिफेन्सिव्ह ऑपरेशनमध्ये सुमारे 30 दहशतवादी वेगवेगळ्या भागात मारले गेले आहेत. काहींना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे.'
विविध जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी :शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याने समुदायांना शस्त्रमुक्त करण्यासाठी कारवाई सुरू केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. इंफाळ पश्चिम येथील उरीपोक येथील भाजप आमदार खवैराकपम रघुमणी सिंह यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या दोन वाहनांना आग लावण्यात आली, असे पीटीआयने एका उच्च सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. पहाटेच्या सुमारास इम्फाळ खोऱ्याच्या आजूबाजूच्या विविध जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. काकचिंगमधील सुगनू, चुराचंदपूरमधील कांगवी, इंफाळ पश्चिममधील कांगचूप, इम्फाळ पूर्वमधील सगोलमांग, बिशेनपूरमधील नुंगोइपोकपी, इंफाळ पश्चिममधील खुरखुल आणि कांगपोकपीमधील YKPI येथे गोळीबार झाल्याचे वृत्त आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.