वाराणसी French National Cremated In Kashi : आध्यात्मिक नगरी काशीची ओळख जगातील सर्वात प्राचीन शहर म्हणून आहे. येथे गेल्या ५००० वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृतीच्या खुणा आढळतात. या काशी नगरीत जगभरातून लोक 'मोक्ष' प्राप्तीसाठी येतात. याचीच प्रचिती नुकत्याच घडलेल्या एका घटनेत आली.
फ्रेंच नागरिकावर काशीत अंत्यसंस्कार : काशी शहरात आध्यात्मिक प्रवासासाठी आलेल्या एका फ्रेंच नागरिकाचा नुकताच मृत्यू झाला. या व्यक्तीवर काशीच्या हरिश्चंद्र घाटावर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मायकेल नावाची ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी काशीला आली होती. त्याला काशीमध्ये 'मोक्ष' मिळवायचा होता. मायकलचं तीन दिवसांपूर्वी काशीतच निधन झालं.
काशीमधली अशाप्रकारची पहिलीच घटना : मायकलचं पार्थिव काशी हिंदू विद्यापीठाच्या ट्रॉमा सेंटरच्या शवागारात ठेवण्यात आलं होतं. वाराणसीचे आयुक्त कौशल राज शर्मा यांनी त्याच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलला, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. काशीमधली ही पहिलीच घटना आहे, जेव्हा एखाद्या फ्रेंच नागरिकावर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी त्याचं निधन झालं. त्यानं शेवटचे सुमारे २० दिवस काशीत घालवले.