भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. बैठकीत मंत्रिमंडळाने 'धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020' मंजूर केले. सुधारित मुद्यांसह विधेयकास मान्यता देण्यात आली आहे. यात जास्तीत जास्त 10 वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला जाईल. यानंतर हे विधेयक विधानसभेत मांडले जाईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्यांनी या बैठकीत व्हर्च्युअली सहभाग घेतला.
धार्मिक स्वातंत्र्य विधेयक मंत्रिमंडळात मंजूर झाले आहे. आता हे विधेयक विधानसभेत मांडले जाईल. सुधारित मुद्यांसह हे विधेयक मंजूर झाले आहे. प्रस्तावानुसार अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा नोंदविला जाईल आणि किमान दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद असेल. एक लाख रुपये दंडही ठोठावला जाणार आहे. लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्यांनाही मुख्य आरोपी केले जाईल. त्यांना मुख्य आरोपीप्रमाणेच शिक्षा होईल. त्याचबरोबर लग्नासाठी धर्मांतर करणार्यांना शिक्षा करण्याची तरतूदही या कायद्यात असेल.