महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chandrashekhar Azad Death Anniversary : लाला लजपतरायांच्या खुनाचा बदला ते बलिदान, असे होते चंद्रशेखर आझाद यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान - भारतीय स्वातंत्र्य चळवळ

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात आपल्या बलिदानामुळे चंद्रशेखर आझाद यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्तान रिपब्लिक आर्मीची स्थापना करुन स्वातंत्र्याची चळवळ राबवली. आज चंद्रशेखर आझाद यांचा स्मृतीदिन त्यानिमित्त ईटीव्ही भारतच्या वतीने भारताच्या या थोर सुपुत्राला अभिवादन.

Chandrashekhar Azad Death Anniversary
स्वातंत्र्यवीर चंद्रशेखर आझाद

By

Published : Feb 27, 2023, 11:03 AM IST

हैदराबाद :जालियनवाला बाग हत्याकांडाचा विद्यार्थी दशेत निषेध करणारे चंद्रशेखर आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनेक कारवाया मोठ्या धाडसाच्या असल्याचा उल्लेख भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात लिहिल्या गेला आहे. मात्र इंग्रजांना शेवटपर्यंत सळो की पळो करुन सोडणाऱ्या या भारत मातेच्या सुपत्राने अखेरपर्यंत इंग्रजांच्या चकमा दिला. अखेरच्या क्षणीही त्यांनी इंग्रजांशी लढताना भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी 27 फेब्रुवारीला आपले बलिदान दिले.

कोण होते चंद्रशेखर आझाद :चंद्रशेखर आझाद यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सिताराम तिवारी असे होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील भाबरा या गावात 23 जुलै १९०६ ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सिताराम तिवारी तर त्यांच्या आईचे नाव जगदानी देवी असे होते. मात्र चंद्रशेखर आझाद यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानामुळे त्यांच्या भाबरा या गावाचे आझादनगर असे नामकरण करण्यात आले आहे. चंद्रशेखर आझाद यांनी वयाच्या १४ व्या वर्षीच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता.

चंद्रशेखर आझाद यांना १४ व्या वर्षीच झाली शिक्षा :चंद्रशेखर आझाद हे संस्कृत शिकण्यासाठी बनारस येथे गेले होते. याच काळात १९२० ते १९२१ या दरम्यान महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात कायदेभंग आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनात चंद्रशेखर आझाद यांनी सहभाग घेतला. वंदे मातरम म्हटल्यामुळे त्यांना १५ कोडे मारण्याची शिक्षी मिळाली. मात्र इंग्रज अधिकारी त्यांना कोडे मारत असतानाही त्यांनी वंदे मातरम आणि भारत माता की जय, गांधीजी की जय अशा घोषणा सुरूच ठेवल्या. त्यामुळे त्यांना आझाद असे नाव मिळाले.

का सोडली महात्मा गांधींजीची साथ :चंद्रशेखर आझाद यांनी महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र जालियनवाला बाग हत्याकांड घडल्याने महात्मा गांधी यांनी १९२२ ला असहकार आंदोलन मागे घेतले. त्यामुळे मवाळगटात असलेले चंद्रशेखर आझाद हे प्रचंड दुखावले गेले. त्यांनी महात्मा गांधी यांचा गट सोडून जहाल गटात सहभागी होत भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक कारवाया केल्या. चंद्रशेखर आझाद यांनी महात्मा गांधी यांची साथ सोडल्याने महात्मा गांधी दुखावले गेले. मात्र चंद्रशेखर आझाद आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आपल्या साथिदारांसह भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले तन मन धन अर्पण केले.

हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीची स्थापना :महात्मा गांधी यांच्या गट सोडल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वात काकोरी कांड करुन ते फरार झाले. त्यानंतर त्यांनी उत्तरप्रदेशातील सर्व क्रांतीकारकांना एकत्र करत हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली. काकोरी कांड केल्यानंतर इंग्रजी सैन्याला चांगलाच हादरा बसला. त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्यासह लाहोरला जाऊन लाला लजपतराय यांच्या खुनाचा बदला घेत त्यांनी सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्यावा गोळ्या घातल्या. सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा बदला घेऊन ते दिल्लीत आले. या सर्व क्रांतिकारकांनी दिल्लीत संसदेवर बॉम्बहल्ला करुन त्यांनी इंग्रजी राजवटीलाच हादरवुन टाकले. त्यामुळे इंग्रजी अधिकाऱ्यांनी चंद्रशेखर आझाद यांना पकडण्यासाठी मोठी कुमक कामाला लावली होती. मात्र त्यांना यश आले नाही.

असे दिले बलिदान :इंग्रज अधिकाऱ्यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फासीची शिक्षा सुनावली होती. मात्र ही शिक्षा जन्मठेपेत बगदलण्यासाठी चंद्रशेखर आझाद प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी महात्मा गांधीकडे मध्यस्थी करण्याची याचना करत होते. मात्र त्यांना यश आले नाही. दुसरीकडे जवाहरलाल नेहरू यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर चंद्रशेखर आझाद आपल्या सुखदेव राज याच्याशी अल्फ्रेड पार्कात याबाबत चर्चाच करत होते. मात्र यावेळी सीआयडीचा पोलीस अधिक्षक असलेला नॉट बाबर जीप घेऊन त्या ठिकाणी आला. यावेळी पोलीस आणि चंद्रशेखर आझाद यांच्यात मोठी चकमक झाली. चंद्रशेखर आझाद यांनी तीन इंग्रज सैन्याला यमसदनी धाडले. मात्र चंद्रशेखर आझाद यांच्या बंदुकीत शेवटची गोळी राहिल्याने त्यांनी इंग्रजी सैन्याच्या हाती न लागता ती आपल्या मस्तकात मारुन घेत बलिदान दिले. भारत मातेच्या वीर सुपुत्राने भारताच्या स्वातंत्र्यासाठी २७ फेब्रुवारीला आपले बलिदान दिल्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आज चंद्रशेखर आझाद यांचा स्मृतीदिन त्यानिमित्त भारत मातेच्या या शूरविराला ईटीव्ही भारतचे अभिवादन.

हेही वाचा - Marathi Rajbhasha Din 2023 : का केला जातो 'मराठी राजभाषा दिन' साजरा, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details