महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : 'या' क्रांतिकारकाच्या पिस्तूलचे नाव होते 'बमतुल बुखारा', वाचा सविस्तर... - चंद्रशेखर आझाद यांची गाथा

आझाद यांचे जीवनच नव्हे तर त्यांच्या मृत्यूनेही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांती ( Revolutionized India Freedom Struggle ) घडवली. आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद

By

Published : Dec 25, 2021, 6:04 AM IST

हैदराबाद - चंद्रशेखर आझाद ( Chandrasekhar Azad ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या चंद्रशेखर तिवारी ( Chandrasekhar Tiwari ) यांच्या घोषणेने तरुणांमध्ये देशासाठी लढण्याची भावना जागृत केली. आझाद यांचे जीवनच नव्हे तर त्यांच्या मृत्यूनेही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांती ( Revolutionized India Freedom Struggle ) घडवली. आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या क्रांतिकारकांच्या बलिदानाचे फळ म्हणजे आपण आज एका स्वतंत्र आणि लोकशाही देशात ( Independent and Democratic Country ) राहत आहोत.

स्वातंत्र्य सेनानी चंद्रशेखर आझाद यांची गाथा
  • अन् आझाद जनतेत लोकप्रिय झाले

जुलै 1906 मध्ये मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात जन्मलेले चंद्रशेखर आझाद अवघ्या 15 व्या वर्षी महात्मा गांधींच्या असहकार चळवळीशी जोडले गेले. बनारस येथे गांधींच्या असहकार आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पोलिसांनी आझाद यांना अटक केली आणि मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले. तेव्हा त्यांनी आपले नाव 'आझाद' वडिलांचे नाव स्वातंत्र्य आणि पत्ता जेल, असे सांगितले. यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि क्रूरपणे चाबकाचे फटकेही मारण्यात आले. या घटनेनंतर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांचा गौरव केला आणि चंद्रशेखर आझाद जनतेत लोकप्रिय झाले. हा तो दिवस होता ज्यानंतर चंद्रशेखर तिवारी आता चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखले जाऊ लागले.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : दक्षिणेतील 'या' क्रांतिकारकाने इंग्रज जिल्हाधिकाऱ्यावर झाडली होती गोळी, वाचा सविस्तर

  • 'या' घटनेमुळे ब्रिटिश स्तब्ध झाले

फेब्रुवारी 1922 मध्ये चौरीचौरा येथे क्रांतिकारी जमावाने अनेक पोलीस मारले. तेव्हा महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. गांधींनी असहकार आंदोलन स्थगित केल्याने आझाद निराश झाले आणि कट्टर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाले. 9 ऑगस्ट 1925 रोजी हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनने ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र लढ्याच्या निधीसाठी रेल्वेवर दरोडा घातला. आझाद 10 सदस्यांसह या दरोड्यात सहभागी होते. लखनौला पैसे घेऊन जाणारी रेल्वे आझादसह सहकाऱ्यांनी लुटली आणि या घटनेने स्तब्ध झालेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आझाद यांना अटक करण्यासाठी कटकारस्थान रचला.

  • ...म्हणून आझाद यांनी स्वत:वर गोळी झाडली

27 फेब्रुवारी 1931 रोजी आझाद आपल्या सहकार्यांसह आल्फ्रेड पार्क, प्रयागराज ( अलाहाबाद ) येथे आंदोलनाची योजना आखत होते आणि त्याच वेळी इंग्रजांनी त्यांना सर्व बाजूंनी घेरले. त्यानंतर आझादने आपली पिस्तूल काढत सहकाऱ्यांना निघून जाण्यास सांगितले. आझाद अनेक तास पोलिसांसोबत एकाकी झुंज देत होते. मात्र त्यांच्या पिस्तुलमध्ये आता शेवटची गोळी शिल्लक राहिली होती. पळून जाण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता. आझाद यांना ब्रिटीश राजवटीत बंदिस्त व्हायचे नव्हते. म्हणून त्यांनी शेवटची गोळी स्वतःवर झाडून आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. चंद्रशेखर आझाद यांच्याकडे एक पिस्तूल होते, ज्याला त्यांनी प्रेमाने 'बमतुल बुखारा' असे टोपणनाव दिले होते. याच पिस्तुलीने आझाद यांनी स्वत:ला संपवले. या घटनेनंतर ब्रिटिश अधिकारी ते पिस्तूल इंग्लंडला घेऊन गेले. ३ जुलै १९७६ रोजी हे पिस्तूल देशात परत आणण्यात आले आणि आल्फ्रेड पार्कमधील अलाहाबाद संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले. चंद्रशेखर आझाद यांच्या पराक्रमाच्या अनेक गाथा आहेत. ज्या आजही तरुणांमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण करतात. आपल्या शौर्यामुळे आझाद लोकांच्या हृदयात आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कायमचे अमर झाले.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : शहाजहांची मुलगी जहांआराने वसवलाय 'हा' चौक, वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details