महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणामध्ये आता ऑक्सिजनचीही मोफत घरपोच सेवा; प्रशासनाचा निर्णय - हरियाणा ऑक्सिजन होम डिलिव्हरी

ऑक्सिजनचा काळाबाजार रोखण्यासाठीही या निर्णयाचा फायदा होणार आहे. तसेच, रुग्णांचा घरापासून रुग्णालयापर्यंत जाण्याचा, किंवा रुग्णावाहिका बोलावण्याचा वेळ वाचणार आहे. प्रशासनाचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र, याची अंमलबजावणी कितपत चोखपणे होते आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे...

haryana oxygen delivery
हरियाणामध्ये आता ऑक्सिजनचीही मोफत घरपोच सेवा; प्रशासनाचा निर्णय

By

Published : May 10, 2021, 8:58 AM IST

चंदिगढ : हरियाणामध्ये आतापर्यंत कित्येक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. यातूनच शिकवण घेत सरकारने डोअर-टू-डोअर ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा ऑक्सिजन मोफत घरी पोहोचवला जाणार आहे. सध्या केवळ गुरुग्राममध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, लवकरच इतर जिल्ह्यांमध्येही सुरु करण्यात येणार आहे.

हरियाणामधील रहिवासी Oct.genhry.inया वेबसाईटवर जाऊन ऑक्सिजनची मागणी करु शकतात. याठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुमच्या गरजेनुसार तातडीने ऑक्सिजन तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले आहे. नोडल अधिकारी दिनेश कुमार यांनी सांगितले, की लोकांनी ऑक्सिजनची नोंदणी करण्यास सुरुवातही केली असून, लवकरच प्रशासनाकडून पुरवठा करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

हरियाणामध्ये आता ऑक्सिजनचीही मोफत घरपोच सेवा; प्रशासनाचा निर्णय

योजना कौतुकास्पद, मात्र अंमलबजावणीही आवश्यक..

ऑक्सिजनचा काळाबाजार रोखण्यासाठीही या निर्णयाचा फायदा होणार आहे. तसेच, रुग्णांचा घरापासून रुग्णालयापर्यंत जाण्याचा, किंवा रुग्णावाहिका बोलावण्याचा वेळ वाचणार आहे. प्रशासनाचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र, याची अंमलबजावणी कितपत चोखपणे होते आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण, तीन दिवसांपूर्वी नोंदणी करुनही अद्याप ऑक्सिजन घरी पोहोचला नसल्याच्या तक्रारी आतापासूनच नागरिक करत आहेत.

हेही वाचा :लॉकडाऊनमध्ये भटक्या जनावरांच्या खाद्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद; ओडिशा सरकारचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details