महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रचकोंडा पोलिसांच्या पुढाकाराने 'नॉन कोविड' रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा - रचकोंडा पोलीस बातमी

रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी नॉन कोविड रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचे आज (दि. 28 एप्रिल) उद्घाटन केले. कोरोना काळात रचकोंडा पोलीस आयुक्तालयामार्फत तसेच समाजोपयोगी संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा लोकांना मोठा फायदा होत आहे.

उद्घाटन करताना
उद्घाटन करताना

By

Published : Apr 28, 2021, 8:37 PM IST

हैदराबाद -रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी नॉन कोविड रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचे आज (दि. 28 एप्रिल) उद्घाटन केले. हा उपक्रम स्मार्ट आयएमएस या संस्थेकडून राबविला जात आहे. यामुळे कोरोना नसणाऱ्या पण, रुग्णवाहिकेची गरज असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

ही सुविधा गरजुंसाठी ठरणार वरदान

यावेळी आयुक्त भागवत म्हणाले, स्मार्ट आयएमएस संस्था व स्टॅन प्लस रेड अ‌ॅम्ब्युलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दिलेल्या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडरसह विविध आपत्कालिन सुविधाही आहेत. ही सुविधा गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, अपघातग्रस्तांसाठी वरदान ठरणार आहे.

दोन महिने सुविधा राहणार कार्यरत

ही सुविधा रचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत पुढील दोन महिने सुरू राहील अशी माहिती आयुक्त भागवत यांनी दिली. यावेळी त्यांनी कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहनही केले. याबरोबरच कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठीही येथील पोलीस सक्रिय आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणुसकीच्या भावनेतून आयुक्त महेश भागवत यांचे सतत कार्य सुरू असते.

असा करावा या सुविधेचा वापर

या सुविधेचा वापर करण्यासाठी 9490617234 या क्रमांकावर तसेच 1800121911911 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता, असे आवाहनही पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी केले.

हेही वाचा- देशातील 'या' कोरोना वॉरिअर्सने करून दिले माणूसकीचे दर्शन; त्यांची धाडसी कामगिरी एकदा वाचाच

ABOUT THE AUTHOR

...view details