हैदराबाद (तेलंगणा):तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश सतीश चंद्रशर्मा यांचा फोटो व्हॉट्सअॅप डीपी म्हणून वापरून चोरट्यांनी सायबर फसवणूक केली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सतीश चंद्र यांचा फोटो व्हॉट्सअॅप डीपी ( Fake Whatsapp DP Fraud ) म्हणून वापरून सायबर घोटाळेबाजांनी दोन लाखांची फसवणूक ( fraud with justice sathish chandra whatsapp DP ) केली.
व्हाट्सऍपला लावला फोटो : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले दिल्लीचे विद्यमान मुख्य न्यायाधीश सतीश चंद्रा यांचा एक फोटो चोरटयांनी प्रोफाईलला लावला. अलीकडेच चंद्रा यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. सायबर गुन्हेगारांनी तेलंगणा उच्च न्यायालयात सब-रजिस्ट्रार म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमन्नारायण यांना व्हॉट्सअॅप डीपी म्हणून सीजेचा फोटो वापरून संदेश पाठवला. "मी एका खास मीटिंगमध्ये आहे. मला तातडीने पैशांची गरज आहे. पण माझी सर्व बँक कार्ड ब्लॉक झाली आहेत. मी तुम्हाला Amazon लिंक पाठवतो. त्यावर क्लिक करा आणि 2 लाख रुपयांची गिफ्ट कार्ड पाठवा" असे त्यांना सांगितले.