हुगळी - पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात भाजपा आणि तृणमूल काँग्रेस आमने-सामने असून मतदारसंघातील वातावरण तापलेलं आहे. राज्यात सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. कूच बिहारमध्ये गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
हुगळीमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार लॉकेट चटर्जी यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप लॉकेट चटर्जी यांनी केला आहे. यातच माध्यमांच्या गाड्यांवरही हल्ला झाल्याची माहिती आहे. हुगळीतील चुंचुरा मतदारसंघातून लॉकेट चटर्जी रिंगणात आहेत. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाल्याची माहिती आहे.
गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पोलिसांना यासंदर्भात सर्व माहिती आहे. मात्र, त्यांनी काहीच कारवाई केली नाही, असे लॉकेट चटर्जी म्हणाल्या. तसेच बाबुल सुप्रियो यांनी टॉलीगंजच्या ब्रम्हपूर विभागात एका बोगस मतदाराला पकडल्याची माहिती आहे. यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे.
सितलकुचीमध्ये गोळीबारात चार लोकांचा मृत्यू -