नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला देशातील सर्व विद्यापीठांमध्ये, विशेषत: केंद्रीय विद्यापीठांमध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रमाची (FYUP) अंमलबजावणी सुरू करण्याच्या तयारीत आहेत. शिक्षण मंत्रालयाने सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंना एफवाययूपीच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यास सांगितले आहे. मात्र, असे असले तरी केंद्रीय विद्यापीठांना त्यांचे नियमित 3 वर्षांचे पदवी कार्यक्रम चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याच वेळी, ही नवीन प्रणाली देखील लागू केली जाऊ शकते, अशी माहिती आहे.
केंद्रीय विद्यापीठांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम?
शिक्षण मंत्रालयाने सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंना एफवाययूपीच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यास सांगितले आहे. मात्र, असे असले तरी केंद्रीय विद्यापीठांना त्यांचे नियमित 3 वर्षांचे पदवी कार्यक्रम चालवण्याची परवानगी दिली जाणार आहे.
नव्या शिक्षण प्रणालीनुसार तीन आणि चार वर्ष पदवी अभ्यासक्रम तसचे पदव्यूत्तर पदवीसाठी दोन वर्ष आणि एक वर्ष अभ्यास क्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. या नव्या पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी करायची यासाठी विद्यापीठांना स्वायत्तता असेल, असे सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना सांगितले असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार असला तरी त्या दिशेने काम सुरु केले असल्याचेही ते म्हणाले. तसेच चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होण्याची शक्यता असल्याची माहितीही त्यांनी दिली.