महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Boy Killed in Dogs Attack : मुलांची घ्या काळजी! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू - हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या मुलाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हैदराबादमध्ये घडली. हल्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र तो आधीच मरण पावल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली.

Dogs
कुत्रे

By

Published : Feb 21, 2023, 10:29 AM IST

हैदराबाद : हैदराबादमध्ये सोमवारी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्या मुलाने कुत्र्यांपासून सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते त्याला शक्य झाले नाही. कुत्र्यांच्या हल्यात तो मुलगा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले.

मुलाचे वय केवळ चार वर्षे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामाबाद जिल्ह्यातील इंदलवाई मंडळातील गंगाधर हे चार वर्षांपूर्वी नोकरीसाठी हैदराबादला स्थलांतरित झाले आहेत. ते एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये चौकीदार म्हणून काम करतात. ते पत्नी जनप्रिया, सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा प्रदीप यांच्यासह बाग अंबरपेट येथील एरुकुला बस्ती येथे राहतात. रविवारची सुट्टी असल्याने ते दोन्ही मुलांना घेऊन तो काम करत असलेल्या सेवा केंद्रात गेले होते. त्यांनी मुलीला पार्किंग केबिनमध्ये ठेवले आणि मुलाला सर्व्हिस सेंटरमध्ये नेले.

रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला : मुलगा खेळत असताना ते एका दुसऱ्या चौकीदारासह कामासाठी बाहेर गेले होते. तेथे थोडा वेळ खेळल्यानंतर प्रदीप बहिणीला शोधण्यासाठी केबिनकडे जात असताना भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. घाबरलेला मुलगा त्यांच्यापासून वाचण्यासाठी इकडे-तिकडे धावला, पण कुत्र्यांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी मुलावर एकामागून एक हल्ले केले. एका कुत्र्याने त्याचा पाय व दुसरा हात पकडून एका बाजूला ओढल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. भावाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच्या सहा वर्षीय बहिणीने धावत जाऊन वडिलांना माहिती घटनेची दिली. वडील धावत आले व त्यांनी आपल्या मुलाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडावले. त्यानंतर त्यांनी मुलाला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र मुलगा आधीच मरण पावला असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली.

पैसे नसल्याने डिलिव्हरी बॉयची हत्या : आयफोन विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची घटना कर्नाटकात घडली आहे. आरोपीचे वय अवघे 20 वर्षे असून पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केली आहे. खुनानंतर आरोपीने डिलिव्हरी बॉयचा मृतदेह चार दिवस घरातील बाथरूममध्ये कपड्यात गुंडाळून ठेवला होता. आरोपी तरुण दुचाकीवर बॅग घेऊन जाताना एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपस करत त्याला अटक केली.

हेही वाचा :Guwahati Crime News : गुवाहाटीमध्ये श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती, पत्नीने पती व सासूची हत्या करून केले मृतदेहाचे तुकडे

ABOUT THE AUTHOR

...view details