महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

4 मुलांची आई 21 वर्षीय तरुणाच्या प्रेमात झाली वेडी, पुढे काय झाले वाचा सविस्तर... - बिहार प्रेमीयुगुलाचे लग्न लाऊन दिले

येथील एका 41 वर्षीय चार मुलांच्या आईला एका 21 वर्षीय तरुणावर प्रेम जडले. मानत्ती देवी आणि रवि चौधरी असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. रवि हा जोरावरपुरा पंचायतीअंतर्गत शिरोमणी टोला येथील रहिवासी कैलाश चौधरी यांचा मुलगा आहे.

four sons mother fall in love with 21 years old youth bihar
प्रेमी युगुलाचे लग्न लाऊन देण्यात आले

By

Published : Aug 18, 2021, 2:01 PM IST

Updated : Aug 18, 2021, 2:08 PM IST

खगड़िया (बिहार) - असे म्हटले जाते की प्रेम आंधळे असते. प्रेमात उच-नीच, वय, रंग, रुप, परिस्थिती असा कोणताही भेदभाव काहीच पाहिला जात नाही. याचाच प्रत्यय बिहारच्या खगडियामध्ये आला आहे. कारण, येथील रवि आणि मानत्ती यांचे लग्न हा चर्चेचा विषय बनला आहे. परबत्ता प्रखंड अंतर्गत दरियापुर पंचायतच्या पंचखुट्टी नयागांव मधील प्रेमी युगुलाचे हे लग्न आठवणीत राहणारे आहे. हे लग्न तर साध्या पद्धतीने झाले. मात्र, ज्या परिस्थितीत झाले त्यामुळे हा लग्नसोहळा अविस्मरणीय असा राहणार आहे.

प्रेमी युगुलाचे लग्न लाऊन देण्यात आले

काय आहे नेमका प्रकार?

येथील एका 41 वर्षीय चार मुलांच्या आईला एका 21 वर्षीय तरुणावर प्रेम जडले. मानत्ती देवी आणि रवि चौधरी असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. रवि हा जोरावरपुरा पंचायतीअंतर्गत शिरोमणी टोला येथील रहिवासी कैलाश चौधरी यांचा मुलगा आहे. तर मनत्ती ही दरियापूर पंचायतीच्या पंचखुट्टी नयागाव येथील रहिवासी आहे. रवि आणि मानत्ती एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. यानंतर ते दोन्ही भेटायचे. मागील दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते.

पूरपरिस्थितीचा फायदा घेऊन जायचा भेटायला -

सध्या बिहार राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे, महिलेच्या कुटुंबाचे सर्वाधिक लक्ष शेतातील आणि पिकांच्या नुकसानीवर केंद्रित झाले होते. याचाच फायदा घेत प्रेमीने नेहमी त्याची प्रेयसी मानत्ती देवीला भेटायला जायचा. रविवार रात्री गावातील रहिवाशांना या प्रकाराबाबत माहित झाले आणि त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

हेही वाचा -व्हिडिओ : तालिबान्यांचा जागा झाला 'बचपन का प्यार'

यानंतर ग्रामस्थांनी दरियापूर पंचायतीचे सरपंच शंभू सिंह आणि जोरावरपुरा पंचायतीचे सरपंच पंकज साह यांना बोलावले. दोन्ही बाजूचे लोक उपस्थित होते. तसेच, पंचनामा पेपर करून मुलाने महिलेच्या मागणीनुसार डझनभर गावकऱ्यांसमोर लग्न लाऊन देण्यात आले. विशेष म्हणजे, दोन्ही वेगवेगळ्या जातीतील आहे. तर महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

दोन मुलांना सोबत ठेवणार -

आपल्या चार मुलांपैकी या महिलेने दोन मुलांना सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर दोन मुलांना आजीजवळ ठेवले जाणार आहे. दरम्यान, या लग्नानंतर गावकऱ्यांनी महिलेला तिच्या मुलांसह पतीसोबत निरोप दिला. या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

Last Updated : Aug 18, 2021, 2:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details