गुवाहाटी ( आसाम ) : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे ( MLA Eknath Shinde ) यांनी आसामच्या गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे ( Kamakhya Temple Guwahati ) दर्शन आज सकाळी घेतले.
सकाळी ७.४५ वाजता ते हॉटेल रॅडिसन ब्लू ( Hotel Radission Blu ) येथून दर्शनाला गेले. त्यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर असे चार आमदार ( 4 Rebel Shivsena MLAs ) होते. तेथून ते बोरझार विमानतळाकडे रवाना झाले. ते मुंबईला जाणार कि दिल्लीला हे स्पष्ट झालेले नाही. दर्शन घेतल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, आम्ही सर्व शिवसेनेचे आमदार असून, उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळेस आम्ही सहभागी होणार आहोत.
एकनाथ शिंदेंनी घेतले कामाख्या देवीचे दर्शन.. शिंदे म्हणाले :"आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेत आहोत. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आम्हाला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावले आहे. गुरुवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव होणार आहे. आम्ही उद्या मुंबईला जाणार आहोत." एकनाथ शिंदे यांच्यासह चार बंडखोर आमदार बुधवारी सकाळी ७.४५ वाजता हॉटेल रॅडिसन ब्लू येथून कामाख्यासाठी निघाले. पुन्हा ते कामाख्याहून रॅडिसन ब्लूला परतले. ते मुंबई की दिल्लीला जाणार हे स्पष्ट नाही. शिष्टमंडळ दोन भागात रवाना होणार आहे.
हेही वाचा :Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र