श्रीनगर- वैष्णवीदेवी यात्रेकरूंना ( Vaishno Devi pilgrims death in Katra ) घेऊन कटराहून जम्मूला परतणाऱ्या खासगी बसला भीषण आग लागली. या आगीत चार यात्रेकरुंचा ( 4 pilgrims death in Bus fire ) जिवंत जळून मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत.
एडीजीपी जम्मू यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कटरा येथून 1.5 किमी अंतरावर खरमलजवळ कटराहून जम्मूकडे जाणाऱ्या लोकल बसला आग लागल्याने ( fire broke out in a bus ) हा अपघात झाला. इतर 22 जळालेल्यांवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आधी बसच्या इंजिनला आग लागली. काही वेळातच संपूर्ण बसला आगीने वेढले.
जम्मू-काश्मीरमधील वैष्णवीदेवी यात्रेकरूंनी भरलेल्या बसला भीषण आग लागली. त्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जणांना जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डीजीपी जम्मू ( ADGP Jammu Mukesh Singh ) यांनी सांगितले की, कटरा येथील माता वैष्णवीदेवी मंदिर बेस कॅम्पच्या मार्गावर यात्रेकरूंनी भरलेल्या बसला आग लागली. त्याचवेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट केले की, कटरा येथील बस अपघाताची माहिती मिळताच उपायुक्त रियासी (जम्मू आणि काश्मीर) बबिला राखवाल यांच्याशी संवाद साधला आहे. जखमींना नारायणा रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींना आर्थिक आणि शक्य ती सर्व मदत केली जाईल.