नमक्कल: तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यात एका घरात फटाकाचा स्फोट (Firecracker Explosion) झाल्याने दुकानाचा मालक आणि तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला (four persons died) असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्या घरात फटाके ठेवण्यात आले होते. पोलिसांनी (Namakkal Police) शनिवारी ही माहिती दिली. पहाटे चारच्या सुमारास अचानक हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Firecracker Explosion: फटाक्यांच्या स्फोटात तामिळनाडूमध्ये 4 जणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी - Electrical short circuit
Firecracker Explosion: तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यात एका घरामध्ये स्फोटकांनी पेट घेतल्याने फटाक्यांच्या दुकानाला आग लागून चार जण ठार, (four persons died) तर 4 गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
यामध्ये मोहनूर येथील एका घरासह आजूबाजूच्या काही घरांचे नुकसान झाले असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्यांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परवानाधारक टिल्लई कुमार (37) यांनी त्यांच्या घरात फटाके का ठेवले हे स्पष्ट झाले नाही. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात टिल्लई कुमार, त्याची आई सेल्वी (57) आणि पत्नी प्रिया (27) यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र, कुमार यांची चार वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली, असे ते म्हणाले. कुमार यांच्या शेजारी राहणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेचाही स्फोटामुळे मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. स्फोटामुळे किंवा घरांचे नुकसान झाल्यामुळे भाजलेल्या किंवा जखमी झालेल्या चार जणांना नमक्कल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोणताही कट असण्याची शक्यता नाकारून पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे (Electrical short circuit) झाला की फटाक्यामुळे झाला याचा तपास सुरू आहे.