महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka Crime News : संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या! - कर्नाटक क्राइम

कर्नाटकात एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येची भीषण घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. हत्येतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Crime
क्राइम

By

Published : Feb 25, 2023, 8:13 AM IST

भटकळ (कर्नाटक) : एकाच कुटुंबातील चौघांची विळ्याने वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी कर्नाटकातील भतकळा तालुक्यातील हडवल्ली गावात घडली. सुदैवाने घरात झोपलेले मूल आणि शेजारी राहणारे दुसरे मूल गुंडांच्या तावडीतून बचावले.

संपत्तीच्या वादातून हत्या : शंभू हेगडे (65), त्यांची पत्नी मादेवी हेगडे (45), मुलगा राजीव हेगडे (34) आणि सून कुसुमा भट्ट (30) यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील नातेवाईक विनय श्रीधर भट्ट याने त्यांच्यावर विळ्याने हल्ला करून हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या हत्येतील मुख्य आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास जारी आहे.

नातेवाईकानेच केली हत्या : शंभू भट्ट यांचा मोठा मुलगा श्रीधर भट्ट यांचे सात महिन्यांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. श्रीधर भट्ट यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी विद्या भट्ट यांच्यात कौटुंबिक मालमत्तेतील वाट्यावरुन भांडण झाले. वाटाघाटीनंतर शंभू भट्ट यांनी सून विद्याला मालमत्तेत वाटा दिला. मात्र याच मालमत्तेची देखभाल करणाऱ्या हल्याणी येथील रहिवासी विनय श्रीधर भट्ट याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. घराच्या आवारातच चारही मृतदेह विखुरलेले होते.

भावानेच केली भावाची हत्या : अनैतिक संबंधाच्या संशयातून सख्या भावाचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे घडली आहे. मृत मोठ्या भावाने आरोपी लहान भावाच्या पत्नीशी जवळीक साधत तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. यावरून दोन्ही भावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. या प्रकरणी नातेवाईकांचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न देखील असफल झाला. त्यानंतर काल रागाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावाच्या हत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

आरोपीला अटक : घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला २५ फेब्रुवारीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. चौघांच्या हा हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :Pune Crime: क्लासेसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे

ABOUT THE AUTHOR

...view details