चाकसू (जयपूर)- राजस्थानमधील चाकसू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 च्या बायपासवर आज(शनिवारी) सकाळी इको कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रीट परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा आणि इको कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव इको कारने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये 7 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
राजस्थानमध्ये भीषण अपघातात 4 ठार, परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला - राजस्थानमध्ये इकोकारचा अपघात
राजस्थानमध्ये एका इको व्हॅनचा अपघात झाला. यामध्ये 3 परीक्षार्थी विद्यार्थी ठार झाले आहेत. तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. वाहनाचा चालकही ठार झाला आहे.
चाकसू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 वरील निमोडिया बायपासवरील चौकाजवळ रीट परीक्षार्थिना घेऊन जाणाऱ्या ईको कारने पुढे चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये चालकासह 4 जण ठार झाले. तर सात परीक्षार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जयपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहेत. या इको व्हॅन मध्ये जवळपास 10 परीक्षार्थी प्रवास करत होते. हे सर्व परीक्षार्थी बारा जिल्ह्याच्या आसपासचे रहिवासी होते.
या घटनेची माहिती मिळताच चाकसू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती घटनेतील मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.