हजारीबाग/चाईबासा (झारखंड) : झारखंडमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊन अनेक लोकांचा बळी जात आहे. नुकतेच धनबादमधील एका रुग्णालयात लागलेल्या आगीत ६ जणांना जीव गमवावा लागला होता. आगीची भीषण घटना घडल्याच्या घटनेला आठवडाही उलटलेला नाही तोच राज्यातील दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात एकाच दिवशी आग लागून ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन निरागस बालकांचा समावेश आहे.
पेंढ्यांना आग लागून मृत्यू :दोन निष्पाप बालके जिवंत जळाल्याची हृदयद्रावक घटना हजारीबागमधील बरकठ्ठा येथे घडली. मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एक चार वर्षांचा आणि दुसरा तीन वर्षांचा आहे. या घटनेबाबत सांगितले जात आहे की, दोन्ही मुले पेंढ्यात खेळत होती. यादरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आग लागल्याचे पाहून ग्रामस्थ तेथे पोहोचले, लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
दोन मुलांचा झाला मृत्यू :आग आटोक्यात आणली तोपर्यंत उशीर झाला होता आणि दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रडून रडून नातेवाइकांनी टाहो फोडला आहे. घटनेची माहिती मिळताच बरकठा पोलिसांनी घटनास्थळ गाठून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याचवेळी आगीचे कारण समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाच्या तपासात आहेत.