चेन्नई :तामिळनाडूच्या दिंडिगुलमध्ये बस आणि व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जण जागीच ठार झाले, तर ६०हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी आठ जणांची स्थिती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातातील सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना मदुराई राजाजी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आज (सोमवार) दुपारच्या सुमारास वतलाकुंडु गावाजवळ बस आणि व्हॅनची समोरासमोर टक्कर झाल्याने हा अपघात झाला. या व्हॅनमध्ये कारखाना कामगार प्रवास करत होते.