रांची (झारखंड) -झारखंडमधील कोडरमा येथील औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रकल्पात चिमणीचे काम सुरू असताना लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोडरमा औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्रात 80 फूट उंचीवर बांधकाम करण्यात येत आहे. या कामाचे परीक्षण करण्यास गेलेल्या चार जणांचा गुरुवारी उशिरा मृत्यू झाला आहे. लिफ्टचे वायर तुटल्याने लिफ्ट कोसळली. लिफ्टची वायर तुटल्याने 20 कामगारांपैकी 2 कामगार हे चिमणीवर अडकले होते. शुक्रवारी सकाळपर्यंत कामगारांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
मृतामध्ये महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश
मृतामध्ये विजय कन्स्ट्रक्शन कंपनीचे ऑपरेटर महाराष्ट्राचे रहिवासी कृष्णा प्रसाद कोडाली यांचा समावेश आहे. ही कंपनी नागपुरची आहे. मृतामध्ये कर्नाटकमधील रायचूरचे अभियंता कार्तिक सागर, बिहारमधील गयाचे रहिवासी सुरक्षा अधिकारी नवीन कुमार आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विनोद कुमार चौधरी यांचा समावेश आहे.