जम्मू जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दहशतवादाविरोधात मोठी कारवाई Lieutent Governor Manoj Sinhas action against terrorism केली आहे. बिट्टा कराटे याची पत्नी Bitta Karates wife आणि सय्यद सलाहुद्दीनच्या मुलासह Son of Syed Salahuddin चार सरकारी कर्मचाऱ्यांना Four Government Employees suspended दहशतवादी परिसंस्थेत सामील झाल्यामुळे त्यांच्यावर दहशतवादी संबंधांचा आरोप Alleged terrorist links आहे. त्यामुळे त्यांची सेवा बरखास्त करण्यात आली आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्येत Kashmiri Pandit massacre आपला हात असल्याची कबुली देणारा बिट्टा कराटे या दहशतवाद्याने दिली होती.
दहशतवादी बिट्टा कराटेची पत्नी केएएस परीक्षा उत्तीर्ण1990 च्या दशकात खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या सामूहिक हत्येसाठी जबाबदार असलेल्या बिट्टा कराटे या दहशतवाद्याने 2011 मध्ये काश्मीर प्रशासकीय सेवा (KAS) अधिकारी असबाह अर्जुमंद खान Bitta Karates Wife assabah arjumand khan यांच्याशी विवाह केला. काश्मीर विद्यापीठातून 1999 मध्ये मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता या विषयात एमएची पदवी मिळवणाऱ्या असबाह खान यांनी 2007 पर्यंत कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात संपादक म्हणून काम केले. 2009 मध्ये, खान यांनी काश्मीर प्रशासकीय सेवा (KAS) परीक्षा उत्तीर्ण केली आणि नंतर त्यांना सामान्य प्रशासकीय विभागात नियुक्त करण्यात आले. पुढे असबाह खानने जर्मनीतून पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीजचा कोर्सही केला.