भोपाळ (मध्यप्रदेश) -येथील केरवा धरण (Bhopal Kerwa Dam) येथे सहलीला गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर रातीबड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
एकमेकांच्या वाचवण्याच्या प्रयत्नात तीघे बुडाले - मिळालेल्या माहितीनुसार, चार मित्र अंघोळीसाठी धरणाच्या परिसरात गेले होते. त्यावेळी त्यातील एक जण धरणाच्या पाण्यात उतरला व तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा मित्राने पाण्यात उडील मारली. पण, तोही बुडू लागला त्यांना वाचविण्यासाठी तिसऱ्यानेही उडी मारली. पण, तोही बुडू लागला. चौथा मित्र पाण्याच्या बाहेर राहून मदतीसाठी आर्त हाक मारू लागला. पण, मदत मिळेपर्यंत वेळ निघून गेली होती. (Bhopal Picnic Spot Kerwa Dam)