मुंबई - पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी नरेंद्र मोदी सरकारने त्यांना दिलेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. (Former Bengal CM Buddhadeb Bhattacharya) मंगळवारी पद्मभूषण पुरस्कारांची घोषणा झाली त्यानंतर भट्टाचार्य यांनी पुरस्काराला नकार कळवला आहे. हा भट्टाचार्य यांच्यासह पक्षाचा निर्णय आहे, असे सीपीआय(एम)ने स्पष्ट केले आहे.
तर मी तो नाकारत आहे
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)च्या पॉलिट ब्युरोचे माजी सदस्य, बुद्धदेव भट्टाचार्य हे (२००२ ते २०११)पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 'मला पद्मभूषण पुरस्काराबाबत काहीही माहिती नाही.(Buddhadeb Bhattacharya declined Padma Bhushan Awards) त्याबद्दल मला कोणीही काही सांगितले नाही. (Padma Bhushan Awards 2022)जर त्यांनी मला पद्मभूषण पुरस्कार दिला असेल. तर मी तो नाकारत आहे, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
बुद्धदेव भट्टाचार्य कोण आहेत?
भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. यासोबतच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही राहीले आहेत. (Senior leader of CPI Buddhadeb Bhattacharya (M)) बुद्धदेव भट्टाचार्जी यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. त्यांचे वडिलोपार्जित घर बांगलादेशात आहे. त्यांनी कोलकाता येथील प्रतिष्ठित प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बंगाली साहित्याचा अभ्यास केला आहे. बंगाली (ऑनर्स) मध्ये बी.ए.ची पदवी प्राप्त केली आहे. नंतर ते सीपीआय(एम) मध्ये सामील झाले.