महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद गमाविल्याने बाबुल सुप्रियो यांचा राजकारण संन्यास

माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो फेसबुक यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. त्यांनी निर्णयाची माहिती सोशल मीडियात दिली आहे.

बाबुल सुप्रियो
बाबुल सुप्रियो

By

Published : Jul 31, 2021, 6:42 PM IST

Updated : Jul 31, 2021, 6:58 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. याबाबतची त्यांनी फेसबुकवर घोषणा केली आहे. ते खासदारकीचा राजीनामाही देणार आहेत. मंत्रीपद गमाविल्याने आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्वाशी मतभेद असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.

बाबुल सुप्रियो यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये 2014 पासून विविध मंत्रालयांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना वगळण्यात आलेले आहे. फेसबुकच्या पोस्टमध्ये बाबुल सुप्रियो यांनी राजकारण सोडणार असल्याचे म्हटले.

हेही वाचा-BULLET TRAIN गुजरातमधील वापीजवळ कॉरिडॉरवर उभारला सुमारे 12 मीटर उंचीचा खांब!

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे ?

जात आहे, अलविदा. माझ्या पालकांशी, पत्नी, मित्र यांच्याशी बोललो आहे. त्यांचा सल्ला ऐकल्यानंतर मी तुम्हाा जात असल्याचे सांगत आहे. मी तृणमूल, काँग्रेस, सीपीआयएम अशा इतर कोणत्याही पक्षात जात नाही. मला कोणीही बोलाविले नसल्याचे तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे. मी कुठेही जाणार नाही. मी एकटाच संघाचा खेळाडू आहे. आजपर्यंत फक्त भाजप पश्चिम बंगाल हा एकमेव पक्ष राहिला आहे. सोडत आहे. मी खूप दीर्घकाळ राहिले आहे. मी कुणाला तरी मदत, तर कुणाला तरी निराश केले आहे. ते लोकांनी ठरवायचे आहे. मी समाजकार्यात गुंतणार आहे, हे राजकारणात न राहता शक्य आहे. जर कोणी मंत्रिपद गमाविण्याचा आणि राजकारण सोडण्याचा संबंध जोडत असेल तर ते काही प्रमाणात खरे आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारापासून राज्यांच्या नेतृत्वासोबत मतभेद असण्याचे कारणही आहे.

हेही वाचा-Live Updates : गणपतराव देशमुख पंचत्वात विलीन.. पार्शिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पश्चिम बंगालमधून भाजपच्या या चार खासदारांना मिळाले राज्य मंत्रिपद

बाबूल यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर पश्चिम बंगालमधील चार खासदारांना राज्य मंत्रिपद मिळाले आहे. यामध्ये निशित प्रामाणिक, संतनु ठाकूर, सुभाष सरकार आणि जॉन बार्ला यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

२०२१ पर्यंत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नामोनिशाण मिटेल, असा दावा बाबुल सुप्रियो यांनी केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली तृणमूल पक्षाला बहुमत मिळाले आहे.

Last Updated : Jul 31, 2021, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details