मंगळुरु - काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांचे आज (सोमवार) दुपारी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. मंगळुरु येथील येनेपोया रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. फर्नांडिस यांना यावर्षी जुलै महिन्यात योगासने करताना डोक्याला मार लागला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते.
हे ही वाचा -दिल्लीत दोन मजली इमारत कोसळली; दोन मुलांचा मृत्यू
ऑस्कर यूपीए सरकारमध्ये परिवहन, रस्ते व महामार्ग, कामगार विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. ऑस्कर फर्नांडीस राहुल गांधीसह गांधी परिवाराच्या निष्ठावानांपैकी एक होते. ऑस्कर फर्नांडीस अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष राहिले आहेत. ऑस्कर फर्नांडीस डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील पहिल्या यूपीए सरकारमध्ये एआयसीसी महासचिव, कामगार व रोजगार मंत्रालयाचे राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) होते.
हे ही वाचा -गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची भूपेंद्र पटेल यांनी घेतली शपथ
त्यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून काम पाहिले होते. 1980 मध्ये कर्नाटक राज्यातील उडुपी मतदारसंघातून 7 व्या लोकसभेसाठी निवडले गेले होते. त्याच मतदारसंघातून ऑस्कर फर्नांडीस 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये लोकसभेसाठी निवडले गेले. त्यानंर 1998 मध्ये त्यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात आली. 2004 मध्ये पुन्हा त्यांची राज्यसभेसाठी वर्णी लागली. ते 2004 ते 2009 पर्यंत केंद्रीय मंत्री राहिले. त्