महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Coal Scam Case : कोळसा खाण घोटाळा प्रकरण; विजय दर्डांसह सर्व आरोपी दोषी; 'या' तारखेला होणार शिक्षेवर सुनावणी - विजय दर्डा दोषी

छत्तीसगडमधील कोळसा खाण (Chhattisgarh Coal Scam Case) वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये दिल्ली विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. शिक्षेच्या युक्तिवादावर 18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांचाही (Vijay Darda Convicted) समावेश आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 13, 2023, 5:55 PM IST

Updated : Jul 13, 2023, 7:54 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील विशेष न्यायालयाने गुरुवारी कोळसा घोटाळाप्रकरणी (Chhattisgarh Coal Scam Case) मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील प्रकरणात सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश संजय बंसल यांनी (Vijay Darda Convicted) हा निकाल दिला आहे. त्यामुळे आता या सर्वांना काय शिक्षा होणार की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार हे पाहणे महत्वाचे आहे.

कोण आहेत दोषी - या प्रकरणामध्ये राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एचसी गुप्ता, केएस क्रोफा आणि केसी सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल आदींचा समावेश आहे. या सर्वांना दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

शिक्षेची सुनावणी 18 जुलैला - विशेष न्यायालयाने आयपीसीच्या कलम 120बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे. या प्रकरणी ईडीकडून आणखी काही जणांचा तपास सध्या सुरू आहे. तसेच यातील अनेक आरोपी हे सध्या रायपूर तुरुंगात आहेत. त्यामुळे आणखी काही मासे या प्रकरणी गळाला लागण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण? - सीबीआयने 27 मार्च 2013 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात या सर्वजणांनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआयने 20 नोव्हेंबर 2014 रोजी क्लोजर रिपोर्ट दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार देत प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. आता याप्रकरणातील सर्वांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

हेही वाचा -

  1. Bihar Vidhan Sabha March : भाजपचा बिहार विधानसभेवर मार्च; पोलीस लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू
  2. Leopard Movement In Gaulane : शिकारीच्या शोधत गौळाणे परिसरात बिबट्याचा संचार
Last Updated : Jul 13, 2023, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details