महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनाने निधन - जगन्नाथ पहाडिया मृत्यू

पहाडिया हे १९८०-८१मध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री होते. त्यांनी हरियाणा आणि बिहार या राज्यांचे राज्यपालपदही भूषवले होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जगन्नाथ यांचा मृत्यू धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

Former Rajasthan CM Jagannath Pahadia dies of COVID-19
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनाने निधन

By

Published : May 20, 2021, 6:39 AM IST

जयपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. बुधवारी उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पहाडिया हे १९८०-८१मध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री होते. त्यांनी हरियाणा आणि बिहार या राज्यांचे राज्यपालपदही भूषवले होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जगन्नाथ यांचा मृत्यू धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

"कोविडमुळे पहाडिया आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याच्या वृत्ताने मला धक्का बसला. सुरुवातीपासूनच माझ्याप्रती त्यांना भरपूर स्नेह होता." अशा आशयाचे ट्विट गहलोत यांनी केले.

यानंतर राज्य सरकारने गुरुवारी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. यादरम्यान सर्व सरकारी कार्यालये बंद राहतील. तसेच राष्ट्रीय ध्वज अर्ध्या उंचीवर आणण्यात येईल. तसेच, पहाडिया यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दुपारी १२ वाजता मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. आजच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा :स्व:ताला 'जिवंत' सिद्ध करण्यासाठी व्यवस्थेसोबत झगडताय 66 वर्षीय वृद्ध आजोबा

ABOUT THE AUTHOR

...view details