महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Prakash Singh Badal : प्रकाश सिंग बादल यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अकाली दलाच्या कार्यालयात, पंतप्रधान मोदी दुपारी घेणार अंतिम दर्शन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. प्रकाशसिंग बादल हे पंजाबचे 5 वेळा मुख्यमंत्री राहीले आहेत.

Prakash Singh Badal passed away
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे निधन

By

Published : Apr 25, 2023, 9:27 PM IST

Updated : Apr 26, 2023, 11:12 AM IST

चंदीगड (पंजाब): पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. मोहालीतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जून 2022 मध्ये छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांची तब्येत पुन्हा खालावल्याने त्यांना पीजीआय चंदीगडमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशात दोन दिवशीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. प्रकाश सिंह बादल यांचे पार्थिव शिरोमणी अकाली दलाच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी दुपारी 12 वाजता जाणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती म्हणाल्या श्री प्रकाश सिंग बादल हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे राजकीय नेते होते. सार्वजनिक सेवेतील त्यांची अनुकरणीय कारकीर्द मुख्यत्वे पंजाबपुरती मर्यादित असली तरी देशभरात त्यांचा आदर होता. त्यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे.

कोरोनाची लागण झाली होती : सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये खाजगी रुग्णालयाने म्हटले होते की, 'प्रकाश सिंह बादल अजूनही आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या बारीक निरीक्षणाखाली आहेत. पुढील काही दिवस त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा झाल्यास त्यांना खासगी वॉर्डात पाठवले जाऊ शकते, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. बादल यांना गेल्यावर्षी जूनमध्ये गॅस्ट्र्रिटिस आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला : प्रकाश सिंग बादल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रकास सिंह बादल यांचे निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. असे म्हणत मोदी यांनी एक फोटोही ट्विट केला आहे. पंतप्रधान म्हणाले, प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. भारतीय राजकारणातील ते एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या देशासाठी खूप योगदान दिले. पंजाबच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि कठीण प्रसंगी राज्याला साथ दिली. असे ट्विट मोदी यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे माजी अध्यक्ष सरदार प्रकाश सिंग बादल यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते भारत आणि पंजाबच्या राजकारणाचे आजीवन नेते होते. मी श्री सुखबीर सिंग बादल यांच्यासह त्यांच्या सर्व शोकग्रस्त कुटुंबातील सदस्य आणि समर्थकांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो असे ट्विट करत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

राजकीय प्रवास : प्रकाश सिंग बादल यांनी 1947 मध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी सरपंच निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर ते सर्वात तरुण सरपंच झाले. 1957 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 1969 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. 1969-70 पर्यंत ते पंचायत राज, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय इत्यादी मंत्रालयांचे मंत्री होते. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत बादल यांचा पराभव झाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच पराभव होता. म्हातारपणामुळे त्यांना निवडणूक लढवायची नव्हती, पण मुलगा सुखबीर बादल यांच्या सांगण्यावरून आणि पंजाबमध्ये अकाली दलाची दयनीय अवस्था पाहून प्रकाशसिंग बादल निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तसेच, ते 1970-71, 1977-80, 1997-2002 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झाले. 1972, 1980 आणि 2002 मध्ये ते विरोधी पक्षनेतेही झाले. मोरारजी देसाई पंतप्रधान असतानाही ते खासदार म्हणून निवडून आले होते. 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर ते सर्वात वयस्कर उमेदवार देखील ठरले होते.

हेही वाचा :Shivaji Maharaj Statue In Mauritius: 'या' देशाने उभारला शिवरायांचा पुतळा; २८ एप्रिलला भव्य लोकार्पण सोहळा

Last Updated : Apr 26, 2023, 11:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details