महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Imran Khan Arrest: इम्रान खान यांना कधीही होऊ शकते अटक, पीटीआयचे कार्यकर्ते झाले आक्रमक - Former Prime Minister of Pakistan

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान अध्यक्ष इम्रान खान यांच्या लाहोरमधील निवासस्थानाबाहेर पोलीस पोहचली आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी आलो आहोत. दरम्यान, इम्रान खान यांच्या निवास्थानाबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमा झाले असून जोरदार घोषणा देत आहेत.

Imran Khan Arrest
Imran Khan Arrest

By

Published : Mar 14, 2023, 9:20 PM IST

Updated : Mar 15, 2023, 11:56 AM IST

लाहोर/इस्लामाबाद: तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी त्यांच्या लाहोरमधील जमान पार्क येथील निवासस्थानावर गेले होते. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष यांच्या घराकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी कंटेनर लावून बंद केले आहेत. यासोबतच त्याच्या अटकेपूर्वी निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर काठ्या घेऊन उपस्थित असलेल्या पीटीआय कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

मी जनयुद्ध लढत आहे: पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांनी व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये ते म्हणाले, मला तुरुंगात पाठवून प्रकरण सुटणार नाही. सरकारला वाटते की मी तुरुंगात गेलो तर जनता शांत राहील. पण तसे होणार नाही. जनतेला बाहेर पडावे लागेल आणि मी जनयुद्ध लढत आहे. मला मारून टाका, तुम्हाला देशासाठी लढावे लागेल असही इम्रान खान जनतेला संबोधून म्हणाले आहेत.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज अटक वॉरंट रद्द केले : पीटीआयचे वरिष्ठ नेते फारुख हबीब यांनी पत्रकारांना सांगितले की, काहीही झाले तरी इम्रान खान बनावट खटल्यांमध्ये पोलिसांना शरण येणार नाही. हबीब म्हणाले, महिला न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज अटक वॉरंट रद्द केले आहे. आता पोलीस कोणते नवीन वॉरंट काढतात ते पाहू असही ते म्हणाले आहेत. इस्लामाबाद पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तोशाखाना प्रकरणात इम्रान खानला अटक करण्यासाठी त्यांची टीम येथे आली आहे.

रॅलीत केलेल्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल : गेल्या वर्षी येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना एका महिला न्यायाधीशाला कथितपणे धमकावल्याप्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला पाकिस्तानच्या न्यायालयाने १६ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. 'डॉन न्यूज'च्या वृत्तानुसार, इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोमवारी माजी पंतप्रधानांविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष खान यांच्यावर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका रॅलीत केलेल्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. खान यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जेबा चौधरी आणि उच्च पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पक्षाप्रती 'पक्षपाती' वृत्तीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.

जीवाला धोका असल्याने ट्रायल कोर्टात हजर राहू शकले नाही : सोमवारच्या सुनावणीदरम्यान, खानच्या वकिलाने सांगितले की पीटीआय प्रमुख व्हिडिओ लिंकद्वारे न्यायालयीन कामकाजात उपस्थित राहण्यास तयार आहेत. मात्र, न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी त्यांचा अर्ज फेटाळला आणि पोलिसांना माजी पंतप्रधान खान यांना अटक करून २९ मार्चपर्यंत न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले. खान यांनी नंतर वॉरंटला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले, जेथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश फैजान हैदर गिलानी यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले की खानच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, याचिकाकर्ता त्याच्या जीवाला धोका असल्याने ट्रायल कोर्टात हजर राहू शकले नाही. यानंतर न्यायाधीशांनी वॉरंटला 16 मार्चपर्यंत स्थगिती दिली असून, याच दिवशी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा :Uttarakhand Wedding Rule: मानसिकता आजही तीच! वरातीत महिलांना बंदी, नियम मोडल्यास सामाजिक बहिष्कार

Last Updated : Mar 15, 2023, 11:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details