नवी दिल्ली -देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची आज 30वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. त्यावर त्यांनी 'सत्य, करुणा आणि प्रगती' असं लिहिलं आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधींची 30वी पुण्यतिथी; राहुल आणि प्रियंका गांधींनी वाहिली श्रद्धांजली - राहुल आणि प्रियंका गांधींनी वाहिली श्रद्धांजली
देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची आज 30वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर भूमि या राजीव यांच्या समाधीस्थळी जाऊन वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
प्रियंका गांधी वाड्रांनी देखील ट्विट करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. राजीव गांधींचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, जगात प्रेमापेक्षा मोठी कोणतीच शक्ती नाही, 'दयेपेक्षा मोठं कोणतंच साहस नाही, करुणेपेक्षा मोठी कोणतीच शक्ती नाही आणि विनम्रतेपेक्षा मोठा कोणताच गुरू नाही.'
21 मे 1991 च्या रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये निवडणुकीचा प्रचार करताना बॉम्ब स्फोट घडवून राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती. एक महिला फुलांचा हार घेऊन राजीव गांधींच्या जवळ आली आणि त्या हारमध्ये असलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला होता.