नवी दिल्ली -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे, मनमोहन सिंग यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार
नवी दिल्ली -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे, मनमोहन सिंग यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार
मनमोहन सिंग यांना कोरोनाचे निदान झाल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. आज त्यांची तब्येत बिघडल्याने तसेच कोरोनाचे लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान रविवारी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते, या पत्रात त्यांनी देशात लसीकरण वाढवण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. लसीकरणच देशाला कोरोनाच्या संकटातून वाचवू शकते, त्यामुळे लसीकरणावर भर द्यावा, तसेच 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांचे देखील लसीकरण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी नरेंद्र मोदींकडे केली होती. मनमोहन सिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी सलग दोन टर्म देशाचे पंतप्रधान राहिले आहेत.
हेही वाचा -उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक.. राज्यातील कोरोना स्थितीचा घेणार आढावा